Posts

Showing posts from March, 2022

होळी सण माहिती

  होळी सण माहिती मराठी     होळी हा भारतातील प्राचीन आणि मुख्य सण आहे. हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.हा सण 'रंगांचा सण' म्हणूनही ओळखला जातो.होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते.या‌ होलिका दहनाची एक पौराणिक कथा आहे.     प्राचीन काळी हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर होता.हिरण्यकश्यपुला भगवान विष्णुंचा द्वेष असे.परंतु, हिरण्यकश्यपुचा मुलगा भगवान विष्णुंचा परमभक्त होता. हे हिरण्यकश्यपुला आवडत नसे. हिरण्यकश्यपुने आपला मुलगा प्रल्हादाला ठार मारण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला.‌ शेवटी‌ हिरण्यकश्यपुने आपली लहान बहीण होलिका ला बोलावले. होलिकेला आगीतही भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. हिरण्यकश्यपुच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादाला ‌मांडीवर घेऊन‌‌ आगीत बसली. भगवान विष्णुंना ते आवडले नाही. आणि त्याच आगीत होलिका भस्म झाली. म्हणून आपण होलिका दहन करतो.      प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली‌ असते तिला होळीची माळ म्हणतात. तेथे एक खड्डा खणतात. त्यात झाड...

जागतिक महिला दिन

   माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐💐🙏🏻