होळी सण माहिती

  होळी सण माहिती मराठी

    होळी हा भारतातील प्राचीन आणि मुख्य सण आहे. हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.हा सण 'रंगांचा सण' म्हणूनही ओळखला जातो.होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते.या‌ होलिका दहनाची एक पौराणिक कथा आहे.

    प्राचीन काळी हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर होता.हिरण्यकश्यपुला भगवान विष्णुंचा द्वेष असे.परंतु, हिरण्यकश्यपुचा मुलगा भगवान विष्णुंचा परमभक्त होता. हे हिरण्यकश्यपुला आवडत नसे. हिरण्यकश्यपुने आपला मुलगा प्रल्हादाला ठार मारण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला.‌ शेवटी‌ हिरण्यकश्यपुने आपली लहान बहीण होलिका ला बोलावले. होलिकेला आगीतही भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. हिरण्यकश्यपुच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादाला ‌मांडीवर घेऊन‌‌ आगीत बसली. भगवान विष्णुंना ते आवडले नाही. आणि त्याच आगीत होलिका भस्म झाली. म्हणून आपण होलिका दहन करतो. 

    प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली‌ असते तिला होळीची माळ म्हणतात. तेथे एक खड्डा खणतात. त्यात झाडाची एक फांदी उभी ठेवतात. फांदीभोवती गोवर्या रचतात. संध्याकाळी तेथे सर्व लोक जमतात. होळीची पुजा करतात. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. पुजा झाल्यावर होळी पेटवतात. मग लोक होळीभोवती नाचतात, गाणी गातात. होळीत सर्व वाईट गोष्टी, दुर्गुण जळुन जाव्यात अशी आपण प्रार्थना करतो. होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा असतो. या‌ दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. 

‌    मी आणि माझे मित्र- मैत्रिणी एकमेकांना खुप रंगवतो. आम्हांला एकमेकांना रंगवायला खुप मजा येते. असा हा होळी सण मला खुप आवडतो. 

 ‌      


Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी