कीर्तन: प्रबोधन की मनोरंजन?
नमस्कार मित्रांनो मी आर्या भोसुरे. आज आपण कीर्तन प्रबोधन की मनोरंजन हे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम कीर्तन म्हणजे काय हे जाणून घेणे मला महत्वाचे वाटते म्हणून, आज हा विषय आपण तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत. प्रथम कीर्तनाची व्याख्या, द्वितीय कीर्तनाची माहिती, आणी शेवट कीर्तन: प्रबोधन की मनोरंजनासाठी असते? मित्रांनो कीर्तन मधील किर म्हणजे काढणे, उपटून टाकणे आणी तण म्हणजे गवत. आपल्याला गवत काढायचेच आहे परंतु ते शेतातले नाही बरं का तर श्रोत्यांच्या मनाभोवती असलेले अज्ञानरूपी, अंधःकाररूपी निर्माण झालेले तण उपटून टाकणे म्हणजेच कीर्तन होय, आणी हे कार्य करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. ही झाली कीर्तनाची व्याख्या आता आपण कीर्तनाची माहिती बघणार आहोत. देवश्री नारदांना भारतातील आद्य कीर्तनकार म्हटले जाते.देवश्री नारदांनी कीर्तन हे महर्षी व्यासांना शिकवले पुढे जाऊन व्यास महर्षीनीं ते शुकास शिकवले व पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणी सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो.श्रीमद...