Posts

Showing posts from June, 2022

वटपौर्णिमा मराठी कथा

      फार पूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. पुढे सावित्री उपवर झाल्याने राजाने तिलाच आपला पती निवडण्याची संधी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या ध्रूमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. तो राजा शत्रुकडून हरल्याने आपल्या राणी (पत्नी) व पुत्रासह जंगलात राहत होता. सत्यवान हा शूर व गुणी होता; पण तो अल्पायुषी होता.     भगवान नारदांना सत्यवान अल्पायुषी होता हे माहित होते म्हणून, सावित्रीने सत्यवानाशी विवाह करू नये असे त्यांना वाटत होते. नारदांनी सावित्रीला तिचा होणारा पती (सत्यवान) हा अल्पायुषी आहे हे सावित्रीला सांगितले व, तु सत्यवानाशी विवाह करू नकोस असा सल्ला दिला परंतु, सावित्रीचे सत्यवानावर प्रेम असल्याने तीने सत्यवानाशी विवाह केला.     विवाहानंतर सावित्री आपल्या पती सत्यवान समवेत व सासू- सासऱ्यांसोबत जंगलात राहू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने तीन दिवस कठोर व्रत उपवास केला. तीन दिवसा...

कोणत्या देवांची किती प्रदक्षिणा करावी

१) भगवान शंकरांची अर्धी प्रदक्षिणा केली जाते. २) माता दुर्गांची एक प्रदक्षिणा केली जाते. ३) श्री मारुतींची आणी भगवान गणेशांची तीन प्रदक्षिणा करावी. ४) भगवान विष्णूंची चार प्रदक्षिणा केली जाते. ५) सूर्यदेवांची सात प्रदक्षिणा केली जाते.      ज्या देविदेवतांचे प्रदक्षिणाचे विधान प्राप्त नाही, त्यांची तीन प्रदक्षिणा केली जाते.