कॉलेज कट्टा

 फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक 

तुम्हा सर्वांचे माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे.

          खरं  म्हणजे आज ऑनलाइन हा शब्द मुलांना जवळचा  वाटतो. आतंरजालाच्या मोठ्या वापरातून फेसबुक हे समाज माध्यम आज प्रत्येक व्यक्तीच्या खिशात आहे. मार्क झुकेरबर्गने फेसबुक सर्वांत आधी सुरू केले. २००४ ला फेसबुक आंतरजालावर सुरू झाले ते आजपर्यंत लोकांच्या सेवेत तत्पर  आहे. आजच्या काळात  फेसबुक हे प्रभावी समाजमाध्यम आहे. 
      फेसबुक सगळ्या  मित्रांच्या  गप्पांची हक्काची जागा आहे. कितीतरी मित्रांची भेट फेसबुकमुळे  होते. फेसबुकवर खाते असणार्‍या  व्यक्तीला मतस्वातंत्र्य आहे. फेसबुक स्नेही आपल्याकडील माहीती , संदर्भ , छायाचित्रे इत्यादींचा आपल्या खात्यामार्फत  प्रसार करतात. आपल्या कृतीला जगभरातून फेसबुकस्नेहींद्वारे पसंती - नापसंती जाणून घेता येते. बरेचसे चांगले उपक्रम फेसबुकद्वारे राबवता येते. 
          फेसबुकमैत्रीची दुसरी बाजूही लक्षात घेणे गरजेचे आहे घेतली. फेसबुक म्हटले की बरेच  जण नाक मुरडतानाही दिसतात. वेळेचा  अपव्यय आहे. तासन्तास फेसबुकवर रमलेले असतात, अशीही ओरड असते. फेसबुक हे व्यसन झालेय  की काय अशीही शंका व्यक्त केली जाते. फेसबुकमैत्री ही कधी कधी विघातक क्रूतींकडे  वळण्यास कारण ठरू शकते. फेसबुकमैत्रीत विश्वासाह्रता तपासता येत नाही. विद्यार्थ्यांसाठी फेसबुकमैत्री अभ्यासात व्यत्यय आणणारी ठरु शकते.
          फेसबुकमैत्री जेवढी सुखकारक वाटते  तेवढीच चिंताजनक आहे. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

केशरी गुरुवार व्रत मराठी

माझा छंद निबंध मराठी

विजयादशमी/दसरा महत्व मराठी