केशरी गुरुवार व्रत मराठी

      नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला प्रभू दत्तांचे व्रत या विषयी माहिती सांगणार आहे. गुरुवार हा प्रभू दत्तांचा वार आहे. श्री.दत्त हे आद्यगुरु आहेत. गुरुवार च्या दिवशी पिवळ्या रंगाला महत्त्व असते. गुरुवारी अनेक भाविक मोठ्या संख्येने प्रभू दत्तांची उपासना करतात. तसेच गुरुवारी केळ्याच्या झाडाचे पूजन करण्याला महत्त्व आहे. गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करणे शुभ असते. तसेच गुरुवार चे व्रत केले असल्यास पिवळेच अन्न खायचे असते.
    शिवशंकरांच्या भक्तांसाठी सोमवार चे व्रत, गणेश भक्तांसाठी मंगळवार व बुधवार चे व्रत तसेच प्रभू दत्तांच्या भक्तांसाठी श्री. सत्य दत्त व्रत अर्थात केशरी गुरुवार चे व्रत केले जातात. पूजेसाठी खालील प्रमाणे साहित्य आणावे.
    हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, तांदूळ, विड्याची पाने, साखर, फळे, उदबत्ती, कापूर, निरंजन, समई, चौरंग, चौरंगावर ठेवण्यासाठी पिवळे वस्त्र, पिवळे फुले, प्रसाद, तांब्या, कलश, ताम्हण, पळी, एखादे भांडे, पंचामृत, अत्तर, तसेच दक्षिणा.
    वरील सर्व साहित्याने प्रभु दत्तांची विधीनुसार पुजा- आरती करून घ्यावी. पूजेचे सर्व साहित्य पुजा ठिकाणी आणावे.पुजेच्या ठिकाणी चौरंग ठेवावे. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. चौरंगाला कर्दळी बांधाव्या. तुपाचा दिवा प्रज्वलित करावा.प्रथम प्रभु दत्तांचे स्मरण करून त्यांना व सर्व देवांना नमस्कार करावा तसेच घरातील वडिलधाऱ्या माणसांना नमस्कार करून आसनावर बसावे. स्वतः कुंकू लावून घ्यावे.
    नंतर सत्य दत्त व्रताचा संकल्प घ्यावा. व संकल्प घेतल्यानंतर हातातील पाणी,तांदूळ,फुल एका ताम्हणावर सोडावे. प्रथम श्री.गणेशांचे विधिवत पूजन करावे. व्रताच्या शेवटी सत्य दत्त व्रताची कथा- महात्म्य पठण करावे.एक माळ प्रभु दत्तांच्या 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'  मंत्राचा जप करावा. प्रभू दत्तांची आरती करून नैवेद्य अर्पण करून पुजा समाप्ती करावी. श्री. सत्य दत्त व्रत अर्थात केशरी गुरुवार चे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते.

   जर तुम्हांला एखाद्या व्रताची माहिती हवी असल्यास मला comment box मध्ये कळवा.
       
          Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी