माझा छंद निबंध मराठी

    छंद म्हणजेच आवड. आपण जेव्हा एखादी कला जोपासतो तेव्हा त्याला छंद जोपासने असे म्हटले जाते. कला या अनेक प्रकारच्या असतात.जसे बाप्पांना ६४ कला प्राप्त आहेत तसे प्रत्येकाला विविध प्रकारच्या कला प्राप्त असतात.
    माझी छंद चित्र काढणे हा आहे. चित्र काढण्याबरोबरच मला भाषण, ब्लॉगिंग, गायन, मेहंदी काढणे यांची देखील आवड आहे. चित्र काढताना माझे मन गुंग होऊन जाते. ते चित्र काढताना मला वेळेचेही भान राहत नाही. अनेक वेळा सकाळी चित्र काढायला सुरुवात केली तर संध्याकाळ कशी होऊन जाते हे देखील मला उमगत नाही. मी आजवर अनेक चित्रे काढली आहेत, त्यातीलच काही चित्रे मी शिकत असलेल्या high-school च्या वर्गात आजही भिंतींवर लावलेली आहेत. 
    सुरुवातीला मला चित्र काढायला फारसे जमत नव्हते, परंतु काही काळाने मला चित्र काढायला जमायला लागले. तेव्हापासून ते आजवर मी माझा छंद जोपासत आहे, आणी यापुढेही हा छंद जोपासण्याचा प्रयत्न करेन. मी माझी अनेक चित्रे drawing- book मध्ये जतन केलेली आहेत. उदा,.. बाप्पा, आई- मुलीचे चित्र, बहीण- भावामधील प्रेमाचे प्रतिक असलेले चित्र, इत्यादी,.. 
    चित्र काढणे  मला अत्यंत प्रिय आहे. चित्र काढत असताना माझ्या मनातील विचार, टेंशन सारे नाहीसे होते. कोण मला बोलावत आहे यापेक्षा मला माझे चित्र उत्तमरित्या पूर्ण करायचे आहे केवळ एवढेच माझ्या डोळ्यासमोर राहते. ज्या प्रमाणे कोणतीही कला ही प्रत्येकाला जन्मजात प्राप्त नसते, ती कालांतराने व आवडीने निर्माण होते अगदी तसेच ८वीत असल्यापासून मला चित्र काढण्याची आवड निर्माण झाली. आजही जेव्हाजेव्हा माझ्याकडे मोकळा वेळ असतो अथवा जेव्हा मी निराश होते तेव्हा मी चित्र काढून त्या चित्रामार्फत माझ्या मनातील विचार मांडते. अशी ही कला माझी प्रिय कला आहे.

Comments

Popular posts from this blog

केशरी गुरुवार व्रत मराठी

विजयादशमी/दसरा महत्व मराठी