Posts

Showing posts from April, 2022

माता सती माहिती भाग ३

      माता सतींचे सर्व शक्तीपीठ स्थापित झाल्यानंतर भगवान विष्णु व ब्रह्मदेव माता आदिशक्तिसतीं कडे  जातात व त्यांना, "तुम्ही पुनर्जन्म घ्या व शिवांशी विवाह करून या सृष्टीचा उद्धार करा" असे म्हणतात. त्यावर माता आदिशक्ती सती  म्हणतात, मी पुढील जन्मात हिमालयाची कन्या म्हणजेच पर्वतराज हिमावन ची पुत्री म्हणून पुनर्जन्म घेईल. ठरल्याप्रमाणे माता आदिशक्ती सती राणी मैनावती च्या स्वप्नात दर्शन देतात व मी तुझी पुत्री म्हणून जन्म घेईल असे सांगतात.      काही दिवसांनी माता आदिसती राजा हिमावन च्या घरी त्यांची कन्या म्हणून जन्म घेतात. परंतु, दुसरीकडे भगवान शंकर अजूनही अमरनाथ गुहेत समाधीस्थ असतात. माता आदिसती पुनर्जन्मात पर्वतराज हिमावन ची पुत्री "पार्वती" म्हणून जन्म घेतात. माता पार्वतींच्या पितांचे नाव "हिमनरेश हिमावन" व मातेचे नाव "मैनावती" असते. माता सतींनी "पार्वती" म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर काही तासाने त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक "बहुरूपा" नावाची राक्षसीन येते. तारकासुर राक्षसाने तिला माता पार्वतींचे अपहरण करून त्यांचा वध करण्या...

माता सती माहिती भाग २

      माता सती माहिती भाग १ मध्ये आपण पाहिले की, भगवान शिव आपल्या पत्नींचे म्हणजेच माता सतींच्या पार्थिवासहित संपूर्ण सृष्टीत भ्रमण करत होते. त्यावेळी संपूर्ण सृष्टी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा ही घटना रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले शस्त्र सुदर्शन चक्राने माता सतींच्या देहाचे ५१ भागांमध्ये विभाजन केले व, हे माता सतींच्या शरीराचे अवयव व अलंकार पृथ्वीवर जेथे- जेथे विखुरले तेथे भगवान शिवांनी आपल्या जटांमधुन कालभैरव निर्माण केले. पृथ्वीवर जेथे माता सतींचे शक्तीपीठ आहे, तेथे भगवान कालभैरव त्या शक्तीपीठाच्या सुरक्षेसाठी विराजमान आहेत.           आता आपण माता सतींचे ५१ पवित्र शक्तीपीठ कुठे आहेत हे जाणून घेऊयात.      १) माता हिंगलाज मंदिर, पाकिस्तान     २) श्री माँ नयना देवी मंदिर, हिमाचल प्रदेश    ३) सुगंधा (सुनंदा) शक्तिपीठ, शिकारपुर बांग्लादेश    ४) महामाया शक्तीपीठ, कश्मीर     ५) माँ ज्वाला देवी मंदिर, हिमाचल प्रदेश    ६) माँ अम्बाजी मंदिर, गुजरात    ...

माता सती माहिती भाग १

      पौरानिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मादेवाला ब्रह्मांडाची निर्मिती करायची होती तेव्हा त्यांनी देवी आदिशक्ति आणि भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले. तेव्हा देवी आदिशाक्ति प्रकट झाल्या व भगवान शिवाशी विभक्त होऊन ब्रह्मदेवाला सृष्टीच्या निर्मितीसाठी मदत केली. सृष्टीच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने देवी आदिशाक्तिला पुन्हा भगवान शिवाकडे सोपावयाचे  ठरविले परंतु, भगवान शिव माता आदिशाक्तिला स्वीकारत नव्हते.       माता आदिशाक्तिला भगवान शिवाकडे सोपवण्याकरिता ब्रह्मदेव त्यांचा मानसपुत्र प्रजापती दक्षाला माता आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी तप करण्यास सांगतात व वरदान स्वरूप माता आदिशक्तींना त्यांच्याकडे पुत्री रूपात जन्म घेण्यास सांगतात. दक्ष कित्येक वर्षे कठोर तप करतो व आंतिमत: माता आदिशक्ती प्रजापती दक्ष च्या तपावर प्रसन्न होऊन तेथे प्रकट होतात व दक्ष ला वरदान मागण्यास सांगतात.      तेव्हा आपण स्वतः माझ्या घरी माझी पुत्री म्हणून जन्म घ्या व उचित वेळ आल्यावर मी तुमचे भगवान शिवाशी विवाह करून देईल असे म्हणतात. त्यावर मी तुझी पुत्री म्हणून जन...