माता सती माहिती भाग १

      पौरानिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मादेवाला ब्रह्मांडाची निर्मिती करायची होती तेव्हा त्यांनी देवी आदिशक्ति आणि भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले. तेव्हा देवी आदिशाक्ति प्रकट झाल्या व भगवान शिवाशी विभक्त होऊन ब्रह्मदेवाला सृष्टीच्या निर्मितीसाठी मदत केली. सृष्टीच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने देवी आदिशाक्तिला पुन्हा भगवान शिवाकडे सोपावयाचे  ठरविले परंतु, भगवान शिव माता आदिशाक्तिला स्वीकारत नव्हते. 
     माता आदिशाक्तिला भगवान शिवाकडे सोपवण्याकरिता ब्रह्मदेव त्यांचा मानसपुत्र प्रजापती दक्षाला माता आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी तप करण्यास सांगतात व वरदान स्वरूप माता आदिशक्तींना त्यांच्याकडे पुत्री रूपात जन्म घेण्यास सांगतात. दक्ष कित्येक वर्षे कठोर तप करतो व आंतिमत: माता आदिशक्ती प्रजापती दक्ष च्या तपावर प्रसन्न होऊन तेथे प्रकट होतात व दक्ष ला वरदान मागण्यास सांगतात.
     तेव्हा आपण स्वतः माझ्या घरी माझी पुत्री म्हणून जन्म घ्या व उचित वेळ आल्यावर मी तुमचे भगवान शिवाशी विवाह करून देईल असे म्हणतात. त्यावर मी तुझी पुत्री म्हणून जन्म घेईल परंतु, तु जेव्हा माझा निरादार करशील, माझ्या स्वामींचा निरादार करशील तेव्हा मी तुझा त्याग करेन असं माता आदिशक्ति म्हणतात. व वरदान स्वरूप दक्ष च्या पुत्रीरूपात जन्म घेण्यासाठी होकार देतात. 
     माता सतींनाच शैलपुत्री, पार्वती, गिरीजा, गौरी, उमा, दुर्गा, काली, जगदंबा, शेरावाली, पहाडावाली, चामुंडा, अंबिका, तुळजाभवानी इत्यादी नावांनी ओळखले जातात. प्रजापती दक्ष कश्मीर घाटातील हिमालय क्षेत्रात राहत होते. माता सतींच्या वडिलांचे नाव प्रजापति दक्ष व आई चे नाव प्रसूती असे होते. प्रसूती ही स्वयंभू मनुची तिसरी पुत्री होती. प्रजापती दक्ष ला १६ कन्या होत्या. त्यातील १६ वी कन्या म्हणजे स्वतः माता आदिशक्ति रूपातील माता सती होय. 
     माता सती बाल्यवस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती. तिची ही शूरता पाहून स्वतः राजा दक्ष आश्चर्यचकीत व्हायचे. काही वर्षांनी माता सती मोठ्या झाल्या आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागला, ह्याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवांकडे वाच्यता केली असता, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्य देवीचा अवतार म्हणजेच माता आदिशक्ति असल्यामुळे हिचे विवाह भगवान शिवाशी विवाह होणे उचित होईल. 
     ब्रह्मदेवाचे हे म्हणणे राजा दक्षाने स्वीकारून त्यांनी माता सतींचा विवाह भगवान शिवाशी लावून दिला. हा शिव आणि सती चा विवाह सोहळा म्हणजे 'शिवरात्रि' म्हणून दरवर्षी अनेक भाविक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विवाहानंतर माता सती शिवांबरोबर कैलास पर्वतावर राहण्यास गेल्या. परंतु, दक्ष राजाचे शिवाशी पूर्वीपासूनचे वैर असल्याने तो भगवान शिवांना फारसे महत्त्व देत नसत. 
     एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने माता सतींना आणि भगवान शिवांना आमंत्रण दिले नाही. सतीला आपल्या पतींचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाल्या. भगवान शिवाने तिला माहेरी  जाण्यास रोखले आणि सांगितले की, तु तिथे गेलीस तर ते तुझा देखील अपमान करतील. परंतु, काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिव शंकरांनी मातेला माहेरी जाण्याची परवानगी दिली. 
     तिथे जाताच माता सतीने आपले पिता राजा दक्षाला सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली, मी तुमची पुत्री असूनही तुम्ही मला आणि माझ्या पतींना आमंत्रण का दिले नाही? त्यावर, दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या वैरामुळे घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, "शिव हे स्मशानी, भुत- प्रेतांसोबत राहणारे एक शूद्र व्यक्ती आहेत, ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा भस्म म्हणून शरीरावर लावतात. त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे अशक्य‌आहे, त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल!". 
     आपले पिताच आपल्या पतीविरोधात अपमानास्पद बोलत आहेत हे ऐकून माता दुःखी झाली. परंतु राजा दक्ष जन्मदाता असल्यामुळे त्या थांबल्या. भगवान शिवांच्या‌ झालेल्या अपमानामुळे  माता‌ सतींनी समस्त देवांसमोर त्याच यज्ञकुंडात आपले प्राण दिले. हा घडलेला प्रकार शिवांना कळताच ते आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. केवळ दक्ष च्या अहंकारामुळे आपल्या पत्नीने प्राण दिले म्हणून, भगवान शिवांनी आपले अंश विरभद्र देवाला दक्षचे डोके धडापासून वेगळे करण्याचा आदेश दिला. काही वेळाने भगवान विरभद्र त्या यज्ञात पोहोचले व दक्षचे डोके धडापासून वेगळे केले. मग काही वेळाने भगवान शिव तेथे गेले व सगळ्यांच्या विनंतीवरून दक्ष ला (मेष) बकऱ्याचे डोके बसविले व जिवनदान दिले. तसेच आपल्या पत्नी सतीचे पार्थिव उचलले व त्या पार्थिवासहित संपूर्ण सृष्टीत भ्रमण करू लागले. 
     ही घटना जर कोणी रोखली नाही तर संपूर्ण सृष्टी उध्वस्त होईल, म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने माता सतींचे पार्थिवाचे ५१ भागांमध्ये विभाजन केले. हे ५१ भाग पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले. जेथेजेथे माता सतींचे शरीराचे अवयव पडले तेथेतेथे शक्तीपीठाची निर्मिती झाली. माता सती आपल्यापासून विभक्त झाल्याचे दुःख भगवान शंकरांना जाणवत होते. त्यामुळे माता सतींच्या विरहात भगवान शिव कित्येक वर्षे‌ समाधीस्थ झाले. 
     जेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेव माता आदिशक्ती कडे तुम्ही पुनर्जन्म घ्या व शिवांशी विवाह करून या सृष्टीचा उद्धार करा अशी विनंती करण्यास गेले तेव्हा माता आदिशक्तीने त्यांना सांगितले की मी हिमालयाची म्हणजे पर्वतराज हिमावन ची पुत्री "पार्वती" म्हणून जन्म घेईल असे सांगितले व याच सती ने पुढील जन्मात पार्वती नावाने जन्म घेतला. माता गंगा या पार्वती मातांची सक्खी मोठी बहीण 
आहे.                       
                            धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी