माता सती माहिती भाग ३

      माता सतींचे सर्व शक्तीपीठ स्थापित झाल्यानंतर भगवान विष्णु व ब्रह्मदेव माता आदिशक्तिसतीं कडे  जातात व त्यांना, "तुम्ही पुनर्जन्म घ्या व शिवांशी विवाह करून या सृष्टीचा उद्धार करा" असे म्हणतात. त्यावर माता आदिशक्ती सती  म्हणतात, मी पुढील जन्मात हिमालयाची कन्या म्हणजेच पर्वतराज हिमावन ची पुत्री म्हणून पुनर्जन्म घेईल. ठरल्याप्रमाणे माता आदिशक्ती सती राणी मैनावती च्या स्वप्नात दर्शन देतात व मी तुझी पुत्री म्हणून जन्म घेईल असे सांगतात.
     काही दिवसांनी माता आदिसती राजा हिमावन च्या घरी त्यांची कन्या म्हणून जन्म घेतात. परंतु, दुसरीकडे भगवान शंकर अजूनही अमरनाथ गुहेत समाधीस्थ असतात. माता आदिसती पुनर्जन्मात पर्वतराज हिमावन ची पुत्री "पार्वती" म्हणून जन्म घेतात. माता पार्वतींच्या पितांचे नाव "हिमनरेश हिमावन" व मातेचे नाव "मैनावती" असते. माता सतींनी "पार्वती" म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर काही तासाने त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक "बहुरूपा" नावाची राक्षसीन येते. तारकासुर राक्षसाने तिला माता पार्वतींचे अपहरण करून त्यांचा वध करण्यासाठी पाठवलेले असते.
     बहुरूपामध्ये मायावी शक्ती असते.तिला कोणाचेही रूप धारण करण्याचे वरदान असते. काही वेळाने रात्र होते. राजा हिमावन बाहेरच काही सैनिकांशी बोलत असतात. इतक्यात, बहुरूपा राक्षसीन राणी मैनावती चे रूप धारण करून बालपार्वती ज्या कक्षात झोपल्या असतात त्या कक्षात जाते व पार्वतींना घेऊन पळून जात असते. काही वेळाने हिमावन ला कळते की, ती स्त्री मैनावती नव्हत्याच. तेव्हा राजा हिमावन धावत पार्वतींच्या कक्षात जातात पण, ते बघतात की पार्वती तेथे नसतात. हे सर्व पाहून राजा हिमावन चिंतीत होतात व रागावून सर्व सैनिकांना बोलावतात.
     आत्ता जी स्त्री आमच्या कक्षात येऊन गेली ती मैनावती नव्हतीच. त्यामुळे त्वरित त्या बहुरूपी स्त्री कडून आमच्या पुत्री ला परत आणा. ती बहुरूपी स्त्री आत्ताच काही वेळापूर्वी येथून गेली त्यामुळे, ती काही जास्त अंतरापर्यंत गेलेली नसणार. काही वेळाने बहुरूपा पार्वतींना घेउन एका उंच टेकडीच्या माथ्यावर जाऊन थांबते. त्या टेकडीच्या खाली ज्वालामुखी असते. तेव्हा ती पार्वतींना घेऊन  पुढे जातच असते अचानक एका दगडावरून तिचा पाय घसरतो व माता तिच्या हातुन निसटुन‌ खाली जमिनीवर पडतात पण‌ त्या सुरक्षित असतात. ती बहुरूपा घरंगळत टेकडीवरून खाली पडणार असते इतक्यात माता तिचे काही केस पकडतात व त्या बहुरूपाचा जीव वाचतो. मग बहुरूपा त्या टेकडीतून वर आल्यानंतर मातेला प्रणाम करते व आहे त्याच ठिकाणी मातेला ठेऊन जाते.
     काही वेळाने ज्या ठिकाणी पार्वतींना ठेवले असते त्या ठिकाणी ऋषी दधीची, ऋषी कश्यप, ऋषी मार्कंडेय व इतर ऋषी पोहोचतात. पार्वतींना घेऊन ते सर्व ऋषी त्यांच्या निवासाच्या दिशेने जातात. पार्वतींना त्या राणी मैनावतींच्या हातात देतात. आपली पुत्री मिळाली म्हणून राणी मैनावती व राजा हिमावन अत्यंत प्रसन्न होतात. ऋषी कश्यप म्हणतात की तुम्ही आणी तुमची पुत्री आमच्या आश्रमात चला. तेथे तुम्ही सुरक्षित रहाल. हे सर्व ऐकून राणी मैनावती त्यांच्या आश्रमात राहण्यास तयार होतात. 
     काळ सरू लागतो. भगवान शंकरांच्या गुहेबाहेर त्यांचे त्रिशूल असते. त्या त्रिशूलातील डमरू विलग होते व ऋषी दधीचींच्या आश्रमात डमरू येऊन पडतो. माता पार्वती थोड्या मोठ्या होतात. एके दिवशी आश्रमात माँ पार्वती एके ठिकाणी मातीत खेळत असतात.हे पाहून राणी मैनावती मातेला घेऊन तिथून निघून जाते. परंतु, पुन्हा माता त्याच ठिकाणी येऊन थांबतात. हे पाहून राणी मैनावती पार्वतींवर रागावतात. काही वेळाने माता पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबतात. तेव्हा ऋषी दधीची म्हणतात, थांबा महाराणी. माता वारंवार त्याच ठिकाणी जात आहे याचा अर्थ या स्थानाचा आणी मातेचा नक्कीच काहीतरी संबंध असणार.
     ऋषी दधीची त्यांच्या आश्रमातील काही शिष्यांना बोलावून माता ज्या ठिकाणी वारंवार जात आहे तिथली माती खोदायला सांगतात. सर्वजण माती खोदतात. त्या मातीत डमरू सापडते. सर्वजण डमरू उचलण्याचा प्रयत्न करतात पण डमरू काही उचलला जात नाही. मग ऋषी दधीची स्वतः प्रयत्न करतात तरीदेखील डमरू उचलला जात नसल्याने ऋषी दधीची विचार करू लागतात व काही वेळाने अति प्रसन्न होऊन म्हणतात, हा डमरू नी: संदेह भगवान शंकरांचा आहे. हा डमरू फक्त भगवान शंकरच उचलू शकतात. यावर माता स्मितहास्य करतात. काही वेळाने माता तेथे मातीत जाऊन बसतात व भगवान शंकरांचे डमरू उचलून डमरू वादन करू लागतात. त्या डमरूतुन अतिशय मधुर ध्वनी लहरी निघत असतात. जे डमरू कोणीही उचलू शकले नाही तेच डमरू मातेने बाल्यावस्थेत उचलले त्यामुळे सर्वजण मातेकडे आश्चर्याने पाहू लागले.
     काही काळ जातो. पार्वती‌ माता मोठ्या होउ लागतात. माता पार्वती या माता सतींचा अवतार असल्यामुळे त्यांना भस्म प्रिय असणारच. त्या एकदा अघोरी साधूंसोबत स्मशानात कोणालाही न सांगता जातात. तेथे सर्व अघोरी एका शेकोटी भोवती डमरू वादन करत त्याभोवती फिरत असतात. माता तेथील भस्म घेते व स्वतः भस्म लावते. हे सर्व दृश्य पाहून राणी मैनावती क्रोधित होतात व त्याच क्षणी मातेला घेऊन तेथून निघून जातात.
      माता पार्वतींचे असे भस्म लावणे, शिवांची भक्ती करणे राणी मैनवतींना पसंत नव्हते. म्हणून एके दिवशी माता पार्वती त्यांच्याजवळ असलेला डमरू घेऊन एका टेकडीवर जाऊन थांबतात. माता ते डमरू टेकडीवरून खाली टाकणारच असते इतक्यात, तिथे माता सती प्रकट होतात व त्या पार्वतींना म्हणतात, "जसं आज तुझ्यासोबत घडतंय तसं‌ माझ्यासोबतही घडलं होतं. पण तु ती चुक करू नकोस! जी चुक मी केलती". यावर पार्वती माता म्हणतात, असं काय घडलं होतं तुमच्यासोबत? माता सती म्हणतात, ज्या प्रकारे शिवांचा हा डमरू तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला त्याचप्रमाणे माझ्यापर्यंत देखील एक वस्तू पोहोचली होती. ती वस्तू म्हणजेच, "रुद्राक्ष".
     पण, मी त्याचं महत्त्वच ओळखू नाही शकले. ज्याप्रकारे तु शिवांची भक्ती केलेली तुझ्या मातेला आवडत नाही, त्याप्रकारे माझ्या पिताजींना देखील आवडत नव्हते. माता पार्वती म्हणतात, "तुमची आणी माझी कथा तर एकसारखीच आहे ना?" यावर माता सती स्मितहास्य देऊन बोलतात, "तुझी आणी माझी कथा एकच तर आहे". तु शिवांची भक्ती करण्याचा तुझी माता विरोध जरूर करेल. मग तु काय करणार? माता पार्वती म्हणतात, मी हे डमरू माझ्यासोबतच ठेवणार, याची पूजा करणार. आणी मातेला या डमरू चे महत्त्व मी पटवून देणार. तो पर्यंत जो पर्यंत माता या डमरूला स्वीकारत नाही. 
     माता सती म्हणतात, हाच तर फरक आहे तुझ्यात आणी माझ्यात! सती म्हणजे असंयमशील पार्वती, आणी पार्वती म्हणजे संयमशील सती. माता सती शिवांशी मनोमन म्हणतात, "मला कळालंय स्वामी आपलं पुनर्मिलन होईल की नाही! आणी केव्हा. आज सती खऱ्या अर्थाने सती झालीये. सतीला खऱ्या अर्थाने आज मुक्ती मिळालीये. आज पासून सतीची भूमिका समाप्त होते स्वामी कारण, पार्वतीची भूमिका तर केव्हाच आरंभ झालीये". पार्वती तु शिवांना आपल्या संसारात वापस घेऊन ये. शिवांची काळजी घे आणी स्वतः ची पण काळजी घे, येते मी. एवढे म्हणून माता सती तिथून पायी चालत जाऊ लागतात व चालता चालता अचानक अदृश्य होतात. काही तासांनी माता पार्वती ते डमरू घेऊन त्यांच्या आश्रमाच्या दिशेने जातात. काही काळाने माता पार्वती व राणी मैनावती त्यांच्या हिमालय राज्यात परततात.
     माता पार्वती भगवान शंकरांना पती रूपात कशा प्राप्त करतात? हे तुम्हाला पुढील भागात म्हणजेच माता सती माहिती भाग ४ मध्ये वाचायला मिळेल. 
              

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी