माता सती माहिती भाग २
माता सती माहिती भाग १ मध्ये आपण पाहिले की, भगवान शिव आपल्या पत्नींचे म्हणजेच माता सतींच्या पार्थिवासहित संपूर्ण सृष्टीत भ्रमण करत होते. त्यावेळी संपूर्ण सृष्टी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा ही घटना रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले शस्त्र सुदर्शन चक्राने माता सतींच्या देहाचे ५१ भागांमध्ये विभाजन केले व, हे माता सतींच्या शरीराचे अवयव व अलंकार पृथ्वीवर जेथे- जेथे विखुरले तेथे भगवान शिवांनी आपल्या जटांमधुन कालभैरव निर्माण केले. पृथ्वीवर जेथे माता सतींचे शक्तीपीठ आहे, तेथे भगवान कालभैरव त्या शक्तीपीठाच्या सुरक्षेसाठी विराजमान आहेत.
आता आपण माता सतींचे ५१ पवित्र शक्तीपीठ कुठे आहेत हे जाणून घेऊयात.
१) माता हिंगलाज मंदिर, पाकिस्तान
२) श्री माँ नयना देवी मंदिर, हिमाचल प्रदेश
३) सुगंधा (सुनंदा) शक्तिपीठ, शिकारपुर बांग्लादेश
४) महामाया शक्तीपीठ, कश्मीर
५) माँ ज्वाला देवी मंदिर, हिमाचल प्रदेश
६) माँ अम्बाजी मंदिर, गुजरात
७) गुजयेश्वरी मंदिर, नेपाल
८) मानसा - दाक्षायनी माता, तिब्बत
९) विरजा देवी मंदिर, उडिसा
१०) गण्डकी शक्तीपीठ, नेपाल
११) बहुला शक्तीपीठ मंदीर, केतुग्राम, पश्चिम बंगाल
१२) मांगल्य चंडिका मंदीर, उज्जैन, पश्चिम बंगाल
१३) त्रिपुर सुंदरी मंदिर, त्रिपुरा
१४) भवानी शक्तीपीठ, चट्टल ढाका
१५) भ्रामरी शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
१६) कामाख्या देवी मंदिर, आसाम
१७) युगाद्या शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
१८) कालीघाट शक्तीपीठ, कोलकत्ता, पश्चिम बंगाल
१९) प्रयाग शक्तीपीठ, उत्तर प्रदेश
२०) जयंती मंदिर, बांग्लादेश
२१) किरीट विमला शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
२२) विशालाक्षी शक्तीपीठ, उत्तर प्रदेश
२३) कन्याकुमारी शक्तीपीठ, कन्याकुमारी, तामिळनाडु
२४) सावित्री शक्तीपीठ, कुरुक्षेत्र, हरियाणा
२५) मणिबंध शक्तीपीठ, अजमेर, राजस्थान
२६) श्री शैल शक्तीपीठ, बांग्लादेश
२७) देवगर्भा शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
२८) कालमाधव शक्तीपीठ, मध्य प्रदेश
२९) शोणदेश शोणाक्षी शक्तीपीठ, मध्य प्रदेश
३०) रामगिरि शक्तीपीठ, उत्तर प्रदेश
३१) श्री उमा शक्तीपीठ, वृंदावन, उत्तर प्रदेश
३२) शुचि- नारायणी शक्तीपीठ, तामिळनाडु
३३) पंच सागर शक्तीपीठ, वाराणसी, उत्तर प्रदेश
३४) अपर्णा शक्तीपीठ, करतोयातट, बांग्लादेश
३५) माता भ्रमराम्बा देवी शक्तीपीठ मंदिर, आंध्र प्रदेश
३६) विभाष शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
३७) चंद्रभागा शक्तीपीठ, गुजरात
३८) अवंती शक्तीपीठ, मध्य प्रदेश
३९) जनस्थान शक्तीपीठ, महाराष्ट
४०) सर्वशेल शक्तीपीठ, गोदावरीतीर, आंध्र प्रदेश
४१) माँ अंबिका शक्तीपीठ, विराट भरतपुर, राजस्थान
४२) रत्नावली शक्तीपीठ, हुगली, पश्चिम बंगाल
४३) मिथिला शक्तीपीठ, बिहार
४४) जयदुर्गा शक्तीपीठ, बैजनाथ धाम देवघर, झारखंड
४५) कालिका तारापीठ, नलहाटी, पश्चिम बंगाल
४६) जयदुर्गा शक्तीपीठ, कर्नाट, हिमाचल प्रदेश
४७) महिषमर्दिनी शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
४८) यशोरेश्वरी शक्तीपीठ, यशोर, बांग्लादेश
४९) अट्टाहास शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
५०) नंदीपुर शक्तीपीठ, पश्चिम बंगाल
५१) इंद्राक्षी शक्तिपीठ, कोणेश्वरम मंदिर, श्रीलंका.
माता सती माहिती भाग ३ मध्ये आपणांस सती ते पार्वती पर्यंतचा प्रवास वाचायला मिळेल.
धन्यवाद
Comments
Post a Comment