श्री गणेश आरती मराठी
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।। जय देव, जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मात्रे मन कामना पुरती ।। ध्रू ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुमकुम केशरा ।। हरेजडीत मुकुट शोभतो बरा । रूनझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।२।। ।। जय देव जय देव० ।। लंबोदर पितांबर फणिवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।। दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ।।३।। ।। जय देव जय देव० ।।