गणेश चतुर्थी व्रत कथा मराठी

    एकदा महादेव आणी पार्वती माता नर्मदा नदीच्या काठी गेले. तेथे पार्वतींनी महादेवांसोबत एका सुंदर ठिकाणी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा महादेव म्हणाले की, आपल्या पराभवाचा आणी विजयाचा साक्षीदार कोण असेल? तेव्हा पार्वती मातेने तिथल्या गवतातून पेंढया गोळा केल्या आणी एका बालकाचा पुतळा बनविला आणी त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून त्यांना म्हणाल्या, बाळा! आम्ही चौपद खेळतो. खेळाच्या शेवटी कोण जिंकेल, कोण हरेल हे तु ठरवायचं.
   खेळाला सुरुवात झाली. महादेव आणी माँ पार्वती चौपद खेळू लागले. योगा- योगाने पार्वती मातांनी तिन्ही वेळा खेळात विजय मिळवीला. शेवटी जेव्हा त्या बालकाला जय- पराजयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने महादेवांना विजयी घोषित केले. यामुळे माता पार्वती रागावल्या आणी पार्वती मातांनी क्रोधित होऊन त्या बालकाला एका पायाने लंगडा होऊन तेथेच चिखलात पडून दुःख भोगण्याचा श्राप होता. बालकाने नम्रपणे सांगितले, आई, माझ्या अज्ञानामुळे हे घडले आहे. मी हे काही रागाने अथवा कुटीलपणाने केले नाही.तुम्ही मला माफ करा. 
    तेव्हा पार्वती मातांनी त्याला सांगितले की, सर्प कन्या गणेशाची पूजा करण्यासाठी येथे येतील. त्यांच्या सांगण्यानुसार गणेशाचे व्रत करून तु मला प्रसन्न करशील. एवढे बोलून माता कैलास पर्वतावर निघून गेली. वर्षभरानंतर श्रावण महिन्यात सर्पकन्या गणेशांची पूजा करण्यासाठी तेथे आल्या. सर्पकन्यांनी गणेशाचे व्रत केले आणी त्या बालकालाही व्रताचे नियम, पद्धत सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार त्या बालकाने २१ दिवस श्री. गणेशांचे व्रत केले.
    गणेशजींनी त्या बालकाला दर्शन दिले आणी सांगितले की, मी तुझ्या व्रताने प्रसन्न आहे. इच्छित‌ वरदान माग. बालक म्हणाली की, देवा माझ्या पायात एवढी शक्ती दे की मी कैलास पर्वतावर माझ्या आई- वडिलांपर्यंत पाहोचू शकेल आणी ते माझ्या प्रसन्न होतील. गणेशजी तथास्तु म्हणत अंतर्धान पावले. बालक महादेवांच्या चरणी पोहोचले, बालकाने संपूर्ण कथा महादेवांना सांगितली. तिकडे त्याच दिवशी पार्वती माँ महादेवांवर नाराज होऊन काही काळ विभक्त झाल्या.
    यानंतर महादेवांनी त्या बालकाप्रमाणे २१ दिवस उपवास केला,व त्या व्रताच्या प्रभावामुळे  पार्वतींच्या मनात महादेवांना भेटण्याची इच्छा जागृत झाली व त्या लवकरच कैलास पर्वतावर येऊन पोहोचल्या. तेथे पोहोचल्यावर मातेनी महादेवांना विचारले की, तुम्ही असा कोणता उपाय केला की, ज्याचं फळ म्हणून मी तुमच्याकडे त्वरित धावत आले? तेव्हा महादेवांनी मातेला 'गणेश व्रताचा' इतिहास सांगितला. 
    पार्वती मातेने आपला पुत्र कार्तिकेयला भेटण्याच्या इच्छेने गणेशजींची दुर्वा, पुष्प, लाडू व मोदकाने २१- २१ या संख्येने पूजा केली. एकवीसाव्या दिवशी कार्तिकेय स्वतः पार्वती मातेला भेटायला आले. मातेच्या मुखातून या व्रताचे महत्त्व ऐकून त्यांनीही उपवास केला. कार्तिकेयांनी हेच व्रत विश्वमित्रजींना सांगितले. त्यांनीही उपवास केला आणी गणेशजींना जन्मापासून मुक्त झालेल्या ब्रह्मा ऋषी होण्याचे वरदान मागितले. गणेशजींनी त्यांची ईच्छा पूर्ण केली.ही गणेश चतुर्थीची व्रत कथा आहे. या व्रताने मनुष्याच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात.

                       श्री गणेशाय नमः

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी