श्री गणेश आरती मराठी
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मात्रे मन कामना पुरती ।। ध्रू ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।
हरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रूनझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।२।।
।। जय देव जय देव० ।।
लंबोदर पितांबर फणिवर बंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ।।३।।
।। जय देव जय देव० ।।
Comments
Post a Comment