Posts

Showing posts from January, 2022

झुलवा पाळणा बाळ शिवाजी चा !

     झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा!       नमस्कार! आज मी तुमच्यासाठी 'राजाछत्रपती' मधील 'झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा' हे गाणे सादर करणार आहे.     झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२)    चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा...(२)     झुलवा पाळणा पाळणा,बाळ शिवाजी चा...(२)     (गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा     उंच अंगड घालून, त्याच्या पायी घुंगर वाळा...(२)     (राजस रुपड डोही, टोपडं‌ पाहून सुख गोपाळा     लिंब लोन ऊतरा गं, लवकर दृष्ट लागल बाळा)...(२)     कौसल्येचा राम जसा, हा लाल यशोदेचा     झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२)     जो जो रे बाळा... जो जो रे....(२)     जाग रे बाळा... जागा रे     ढोल नगारे घुमुद्यात, रे झळुद्यात चौघडे     शिवनेरीच्या सदरेवर, भगवा झेंडा फडफडे     गडगडाचे चिरे हरपले, सह्याद्रीचे कडे     बाळा तुझियासाठी, मावळे मर्द...

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पोवाडा

   मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पोवाडा         नमस्कार. आज मी तुमच्यासाठी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा' सादर करणार आहे.   महाराजांची,   शिवाजी महाराजांची किर्ती, बेफाम होती   महाराजांची किर्ती बेफाम, भल्याभल्यांना फुटला घाम,   याला कोण घालील येसन   दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहाची आई बरं का!   नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,    कुणी घेइना पुढाकार,        साऱ्यांनीच मानली हार       इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएँगे शिवाजी को     आन् त्यानं विडा उचलला,      ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ नाव त्याचं अफजलखान ...(२)   जिता जागता जणु शैतान  खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून,   वाहवाह ! सुभान अल्ला.  कौतिक झालं दरबाराचं आन्  खान निघाला मोठ्या गुर्मीत , त्याच घ...

कॉलेज कट्टा

     माझा महाविद्यालयातील पहिला दिवस.        तुम्हा सर्वांचे माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर 'माझा महाविद्यालयातील पहिला दिवस' हा विषय सादर करणार आहे.       माझा महाविद्यालयातील पहिला  दिवस अविस्मरणीय होता. नवे महाविद्यालय, नवे शिक्षक, नवे मित्र-मैत्रीणी सारं काही नवीन होतं. महाविद्यालयातील पहिला दिवस असल्याने मला अस्वस्थ जाणवत होते.  सुरुवातीला वर्गात माझ्या केवळ 2-3 मैत्रीणीच ओळखीच्या होत्या. परंतु ,  काही काळानंतर माझी  वर्गातील सर्वांशी ओळख झाली.       अनेक मैत्रींणींशी  माझी मैत्री झाली. माझ्या मैत्रिणींनी मला अडीअडचणीत  मदत केली. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत परंतु, माझी मैत्रीण ज्ञानेश्वरी व आश्विनी मला अनेकदा मदत केली.  मला नवीन वर्गात अनेक मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण  मिळाले.       तसेच आमची अनेक नवीन शिक्षकांशी ओळख झाली. आमचे प्रत्येक शिक्षक आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत. आम्हाला प्रत्येक मुद्दा नीट समजावून सांगत असे. आम्हाला न समजणारे प्रश...

🌸मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

 मकरसंक्रांत माहिती मराठी       भारतीय संस्कृतीत  मकरसंक्रांत या सणाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार मकरसंक्रांत या दिवशी भगवान विष्णूंनी प्रूथ्वीवरील असुरांचा विनाश केला  व असुरांवर भगवान विष्णूंनी विजय मिळविला आणि हा विजय मिळाल्याने  मकरसंक्रांत हा सण साजरा केला  जातो.  मकरसंक्रांतीत  उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभकाळ मानला जातो.         मकरसंक्रांत हा सण कुठे कुठे , कोणत्या नावाने ओळखला जातो ?      हा सण महाराष्ट्रात 'मकरसंक्रांत' म्हणून साजरा करतात.  तसेच आसाम, गुजरात व  राजस्थानमध्ये 'उत्तरायण' म्हणून  तर तामिळनाडू मध्ये 'पोंगल' आणि बिहार व  कर्नाटकात 'संक्रांती' म्हणून साजरा केला जातो.  पंजाबमध्ये व जम्मू काश्मीर मध्ये 'लोहडी' म्हणून साजरा केला जातो.     संक्रांतीचा सण खरा तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत.       भोगी :      मकरसंक्रांतीच्या एक दिवस अगोदर येणाऱ्या दिवसाला ' भोगी'   असे म्हणतात....