झुलवा पाळणा बाळ शिवाजी चा !

    झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा!

      नमस्कार! आज मी तुमच्यासाठी 'राजाछत्रपती' मधील 'झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा' हे गाणे सादर करणार आहे.

    झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२)

   चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा...(२)

   झुलवा पाळणा पाळणा,बाळ शिवाजी चा...(२) 

   (गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा 

   उंच अंगड घालून, त्याच्या पायी घुंगर वाळा...(२) 

   (राजस रुपड डोही, टोपडं‌ पाहून सुख गोपाळा 

   लिंब लोन ऊतरा गं, लवकर दृष्ट लागल बाळा)...(२) 

   कौसल्येचा राम जसा, हा लाल यशोदेचा 

   झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२) 

   जो जो रे बाळा... जो जो रे....(२) 

   जाग रे बाळा... जागा रे 

   ढोल नगारे घुमुद्यात, रे झळुद्यात चौघडे 

   शिवनेरीच्या सदरेवर, भगवा झेंडा फडफडे 

   गडगडाचे चिरे हरपले, सह्याद्रीचे कडे 

   बाळा तुझियासाठी, मावळे मर्द मराठे खडे 

  आज उगवला सूर्य, नभी नव्या नवलाई चा  

  झुलवा पाळणा पाळणा,बाळ शिवाजी चा...(२) 

  चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा 

  झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२) 

   ब्लाॅग आवडल्यास कमेंट करा, फाॅलो  करा.

                        धन्यवाद

     

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी