कॉलेज कट्टा

    माझा महाविद्यालयातील पहिला दिवस. 

      तुम्हा सर्वांचे माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर 'माझा महाविद्यालयातील पहिला दिवस' हा विषय सादर करणार आहे. 

     माझा महाविद्यालयातील पहिला दिवस अविस्मरणीय होता. नवे महाविद्यालय, नवे शिक्षक, नवे मित्र-मैत्रीणी सारं काही नवीन होतं. महाविद्यालयातील पहिला दिवस असल्याने मला अस्वस्थ जाणवत होते. सुरुवातीला वर्गात माझ्या केवळ 2-3 मैत्रीणीच ओळखीच्या होत्या. परंतु, काही काळानंतर माझी वर्गातील सर्वांशी ओळख झाली.
      अनेक मैत्रींणींशी  माझी मैत्री झाली. माझ्या मैत्रिणींनी मला अडीअडचणीत  मदत केली. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत परंतु, माझी मैत्रीण ज्ञानेश्वरी व आश्विनी मला अनेकदा मदत केली. मला नवीन वर्गात अनेक मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण  मिळाले. 
     तसेच आमची अनेक नवीन शिक्षकांशी ओळख झाली. आमचे प्रत्येक शिक्षक आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत. आम्हाला प्रत्येक मुद्दा नीट समजावून सांगत असे. आम्हाला न समजणारे प्रश्न ही सोप्या पद्धतीने समजावून सांगे. आम्हाला शिकवणारे प्रत्येक शिक्षक स्वभावाने खुप चांगले आहेत. 
     आमच्या महाविद्यालयाच्या शेजारी एक मोठ्ठे हिरवेगार झाड आहे. तसेच आमच्या महाविद्यालयाच्या शेजारी २ विद्यालये, १ महाविद्यालय आहेत. आमच्या महाविद्यालया समोर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान आहे. आता मला महाविद्यालयाची सवय झाली आहे. मला माझे महाविद्यालय  खूप आवडते. 

    ब्लॉग आवडल्यास कमेंट आणि फॉलो करा. 

                    🙏 धन्यवाद 🙏



Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी