मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पोवाडा
नमस्कार. आज मी तुमच्यासाठी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा' सादर करणार आहे.
महाराजांची,
शिवाजी महाराजांची किर्ती, बेफाम होती
महाराजांची किर्ती बेफाम, भल्याभल्यांना फुटला घाम,
याला कोण घालील येसन
दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहाची आई बरं का!
नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेइना पुढाकार,
साऱ्यांनीच मानली हार
इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएँगे शिवाजी को
आन् त्यानं विडा उचलला,
नाव त्याचं अफजलखान ...(२)
जिता जागता जणु शैतान
खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, वाहवाह ! सुभान अल्ला.
कौतिक झालं दरबाराचं आन् खान निघाला मोठ्या गुर्मीत , त्याच घोडळ,पायदळ, फौज फाटा लई बक्कळ,
अंगी दहा हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ, वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली.
गावं लुटली, देवळं उद्धवस्त केली. कोण, कोण रोखणार हे वादळ?
आता शिवबांच काही खरं नाही, ईकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलु लागला.
राजांची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर ? चिंतेत पंत सरदार.
रायबा : महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाची सेना अफाट आहे. त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणे अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जावं.
जिजाऊ माँसाहेब : काय म्हणालात रायबा?
रायबा : माँसाहेब हे पहा आम्हांला आमच्या जिवाची परवा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे.
जिजाऊ माँसाहेब : रायबा शिवबा फक्त आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर मात्र भ्याडपणे पळून जाऊन, या मराठी मुलुखाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
छत्रपती शिवाजी महाराज : माँसाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलुखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत येइल.
जिजाऊ माँसाहेब : तथास्तु!
गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा.
प्रतापगडावर,
प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबुल केला. दिवस ठरला अन् ठरल्याप्रमाणं,
प्रतापगडच्या पायथ्याशी खान,
हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान
आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची ...(२)
अन् त्यासी नाही जाणिव शक्तिची ...(१)
अन् करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी ...(१)
रायबा : राजं, जिवा महाल आल्यात.
छत्रपती शिवाजी महाराज : या जिवा. काय म्हणतोय खान?
जिवा : महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात.
छत्रपती शिवाजी महाराज : छान आम्हाला हेच हवं होतं.
जिवा : महाराज आजच्या भेटीचं काय करायचं?
छत्रपती शिवाजी महाराज : पंतांकडे निरोप सांगा की, आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उद्या दुपारची वेळ ठरवा.
जिवा : जी.
छत्रपती शिवाजी महाराज : त्याला वाटु दे की भितीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय.
जिवा : जी, जशी आज्ञा महाराज
खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता.
भेटीसाठी छान उभारिला ...(२)
नक्षीदार शामियान्याला ...(२)
अन् अश्या या शामियान्यात,खान डौलत डुलत आला ...(२)
सैय्यद बंडा त्याच्या संगतीला ...(२)
शिवबाच्या संगती महाला ...(२)
राजांना पाहुन,
राजांना पाहुन खान म्हणतो कसा,
आओ, आओ शिवाजी, आओ
हमारे गले लग जाओ, आओ
हा हा हा हा हा ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
खान हाक मारितो हसरी ...(२)
रोकुन नजर गहिरी,
जी रा हा जी र जी जी जी
खानाने राजांना आलिंगण दिलं अन् दगा केला,
खान दाबी मान मान्याला ...(२)
कट्यारीचा वार त्यानं केला ...(२)
खर खर आवाज झाला ...(२)
चिलखत व्हतं अंगाला ...(२)
खानाचा वार फुका गेला खान येडबडला,
इतक्यात महाराजांनी ,
पोटामंधी बिछवा ढकलला ...(२)
वाघ नखांचा मारा केला ...(२)
टराटरा फाडला पोटाला,
तडा गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी... (२)
प्रतापगडाचे युद्ध जाहले ...(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट ...(२)
लावली गुलामिची हो वाट...(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी ...(३)
ब्लाॅग आवडल्यास कमेंट आणि फाॅलो करा.
🙏 धन्यवाद 🙏
Comments
Post a Comment