आपली सुर्यमाला माहिती

 आपली सूर्यमाला माहिती

       आज मी तुम्हाला सूर्यमालेची माहिती सांगणार आहे. सूर्य हे नाव सर्वांनीच ऐकले असेल. सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे. काही खगोलीय गोष्टी सूर्याभोवती ठराविक कक्षेत फिरताना दिसतात, त्यांना 'ग्रह' म्हणतात. आपल्याला दिसणार्या  सूर्याभोवती एकूण आठ ग्रह फिरत आहेत. काही ग्रहांभोवतीसुद्धा लहान खगोलीय गोष्टी फिरताना दिसतात. त्यांना 'उपग्रह' असे म्हटले. ग्रहांचा आकार सूर्याच्या तुलनेत खूप लहान असतो. उपग्रहांचा आकार या द्रूष्टिकोनातून खूपच लहान वाटतो. 

    आपण राहतो ती प्रुथ्वी आपल्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. आपल्याला रात्रीच्यावेळी आकाशात दिसणारा चंद्र हा प्रूथ्वीचा उपग्रह आहे. सूर्य, आठ ग्रह आणि उपग्रह मिळून सूर्यमाला बनते. आपल्या  सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत. बुध, शुक्र, प्रूथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. सूर्याला सर्वांत जवळ असणारा ग्रह 'बुध' आहे. त्यानंतर क्रमाक्रमाने बाकीचे ग्रह येतात. 'नेपच्यून' हा सर्वांत दूरचा ग्रह आहे. यांपैकी बुध हा आकाराने सर्वांत लहान आहे, तर गुरू सर्वांत मोठा आहे.

‌‌   प्रूथ्वीशी तुलना करता बुध प्रूथ्वीपेक्षा निम्म्याहून कमी आकाराचा ग्रह आहे, तर गुरूचा आकार प्रूथ्वीच्या आकाराच्या अकरा पटीहूनही जास्त आहे. शनी या ग्रहाचा आकार प्रूथ्वीच्या जवळजवळ दहापट आहे. फक्त 'शनि' या ग्रहाभोवतीच कडी दिसतात. प्रूथ्वीला एक उपग्रह आहे. मंगळाला आणि नेपच्यूनला प्रत्येकी दोन उपग्रह आहेत. सर्वांत जास्त म्हणजे बारा उपग्रह गुरूला आहेत; तर शनीला दहा उपग्रह आहेत. शनीच्या नंतर असणार्या युरेनसला पाच उपग्रह आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणे इतर अनेक सूर्यमाला अंतराळात आहेत. 

    जर तुम्हांला सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाविषयी माहिती हवी असल्यास, मला कमेंट मध्ये कळवा. तसेच तुम्हाला माझा ब्लॉग आवडल्यास कमेंट जरूर करा. 

          ‌‌‌‌‌‌            धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

केशरी गुरुवार व्रत मराठी

माझा छंद निबंध मराठी

विजयादशमी/दसरा महत्व मराठी