छत्रपती शिवाजी महाराज माहिती

     छत्रपती शिवाजी  महाराज माहिती 

                 "प्रौढ प्रताप पुरंदर" 

              "महापराक्रमी रणधुरंदर"

               ‌"क्षत्रिय कुलावतंस्"

                "सिंहासनाधीश्वर"

                 "महाराजाधिराज"

                 ‌   "महाराज"

                ‌ "श्री" "श्री" "श्री"

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    नमस्कार मित्रांनो माझे नाव आर्या भोसुरे. आज मी तुम्हां सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगणार आहे.

    छत्रपति शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव, शिवाजी शहाजी भोसले असे होते. महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी  शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. 

    शिवरायांची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. जिजामाता त्यांना राम, क्रूष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे; तर कधी ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवराय मावळ्यांसोबत लपंडाव, चेंडू,भोवरा हे खेळ खेळत. शहाजीराजांनी जिजामाता व शिवराय यांना बंगळूरास नेले. तेथे शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे अशे विविध शिक्षण घेउन ते तरबेज झाले. 

     वयाच्या चौदाव्या वर्षी फलटणच्या नाईक-निंबाळकरांची कन्या सईबाई यांच्याशी राजांचा विवाह लाल महालात संपन्न झाला. शिवरायांना एकुण आठ पत्नी‌ होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, काशीबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई. तसेच दोन मुले छत्रपती संभाजी महाराज व राजाराम राजे. राणूबाई, सखुबाई, अंबिकाबाई, दीपाबाई, कमलाबाई, व राजकुंवरबाई या महाराजांच्या कन्या होत्या. 

     १६६५ मध्ये त्यांनी आपल्या सवंगड्यांसह रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र राजमुद्रा संस्कृत भाषेत करून घेतली.

           प्रतिपंच्चंद्रलेखेव वर्धिष्णु‌‌व्रिश्ववंदिता।। 

          शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

       म्हणजे, प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत‌ जातो  व सार्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत‌ जाईल व सार्या विश्वात वंदनीय होईल.

    किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य। ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य।

    या विचारांनी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधावयाचे, असे ठरविले. नंतर त्यांनी तोरणा किल्ल्यास  'प्रचंडगड' असे नाव दिले. महाराजांनी अनेक किल्ले जिंकले व अनेक युद्धे, तह‌ केले. त्यानंतर काशीपंडित गागभट्ट यांनी पौरोहित्य केले. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यांसाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. ६ जून १६७४ मध्ये संपन्न झाला. 

     राजांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. राजे  साधुसंत, मातापिता या सर्वांचा आदर करीत. त्यांनी फितुरांना कडक शासन केले. 'सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे' हा शिवरायांचा बाणा होता. आदर्श पुत्र,‌ सावध नेता, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे अनेक त्यांच्या गुणांचे पैलू आहेत.  

      अशा या थोर राजांचा म्रुत्यू १६८० मध्ये झाला. 

      अन् अशा या जयवंत, यशवंत, किर्तीवंत, गुणवंत राजास माझा मानाचा मुजरा 🙏

                    🙏धन्यवाद🙏

 

 



Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी