नवरात्रीचे नैवेद्य मराठी
नवरात्रीच्या प्रथम दिवशी माता आदिशक्तींच्या प्रथम रूपाचे म्हणजेच माता शैलपुत्रीचे करतात व मातेला गायचे शुद्ध तुप अर्पण केले जाते.
दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते व मातेला साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो.
तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते व मातेला दूध अथवा दुधापासून तयार केलेले पदार्थ चा नैवेद्य दाखविला जातो.
चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते व मातेला मालपोह्याचा नैवेद्य दाखविला जातो.
पाचव्या दिवशी माता स्कंदमातेचे पूजन केले जातो व मातेला कळ्याचा नैवेद्य दाखविला जातो.
सहाव्या दिवशी माता कात्यायनी ची पूजा केली जाते व मातेला मधाचा नैवेद्य दाखविला जातो.
सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते व मातेला गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.
आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते व मातेला नारळाचा नैवेद्य दाखविला जातो.
नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते व मातेला तिळाचा नैवेद्य दाखविला जातो.
Comments
Post a Comment