महाशिवरात्रि ची माहिती मराठी

   महाशिवरात्रि ची माहिती मराठी‌

  महाशिवरात्रि हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. दरवर्षी महाशिवरात्रि हा सण माघी क्रूष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. असं‌ म्हणतात की, याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून या दिवसाला अध्यात्मिक आणि पौराणिक असे दोन्ही महत्व आहे. यंदा महाशिवरात्रि १ मार्च २०२२ रोजी येणार आहे.  

    महाशिवरात्रि ची पुराणकथा : 

    ज्यावेळी समुद्रमंथन झाले तेव्हा, अनेक प्रकारचे हिरे, नवरत्न, शंख, कामधेनु यांसारख्या अनेक गोष्टी मंथनातून बाहेर आल्या. परंतु त्याच वेळी समुद्रमंथनातून मोठ्या प्रमाणात विष बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची क्षमता होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून समस्त ब्रह्मांडाचे रक्षण केले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व त्यांना 'निलकंठ' नाम देण्यात आले. 

    पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे, स्वर्गलोकातील एक दिवस. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात, शिवाच्या या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्रि' असे म्हणतात. या दिवशी माँ‌ पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला असेही काही लोक मानतात. 

  महाशिवरात्रि कशी साजरी केली जाते : 

  'हे जगत्पतये, मी हे फलदायी महाशिवरात्रि चे व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हणावे. संकल्पाचे अर्ध्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे. 

 सकाळी लवकर उठून शुचिर्भुत होऊन स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांना सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतर्याचे फुल, धुप, दीप यांनी मनोभावे‌ पुजा करावी. नैवेद्य दाखवावा, निरांजन ओवाळुन आरती करावी. 

  शिवपिंडीला थंड पाणी, दुध‌ किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पुजेत हळदीकुंकू वापरत नाहीत. मात्र भस्म वापरतात. शिवपुजेत पांढर्या अक्षता वापरतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता, अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप दिवसभर केला जातो. तसेच अनेक शिवभक्त महाशिवरात्रि च्या संपूर्ण रात्रभर‌ जागरण करतात. 

    महाशिवरात्रि च्या सर्व शिवभक्तांना‌ हार्दिक शुभेच्छा 🙏

               🙏धन्यवाद 🙏

    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी