माता सती माहिती भाग ४

    आपण भाग ३ मध्ये पाहिले की, माता सतींच्या सांगण्यावरून बाल पार्वती या स्वतः जवळ असलेले डमरू घेऊन त्यांच्या निवास स्थानाच्या दिशेने जातात. व काही दिवसांनतर राणी मैनावती व पार्वती या त्यांच्या हिमालय राज्यात परतात. काळ सरतो, पार्वती या युवावस्थेत प्रवेश करतात. एके दिवशी राजा हिमावन च्या महालात संदेश येतो की, ऋषी दधीचींना पार्वतींशी काही महत्वाचे बोलायचे आहे, त्यांचे मार्गदर्शन करायचे आहे. त्यावर राजा हिमावन पार्वतींना बोलतात की, पुत्री बहुतेक भगवान विष्णूंनी ऋषी दधीचींना तुझे मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले असेल. तु जा त्यांच्याकडे आणी बघ ते काय सांगतायत तुला. त्यावर पार्वती स्विकृती दर्शवतात व त्वरित ऋषी दधीचींकडे जातात.
    काही क्षणानंतर ऋषी दधीची पार्वतींना सांगतात की, तुम्ही स्वतः माता आदिशक्ती सती आहात, गतजन्मी तुम्ही माता सती होता. मागील जन्मात राजा दक्षाच्या अहंकारामुळे व भगवान शिवांचा अपमान केल्यामुळे तुम्ही दक्षच्या त्याच यज्ञात स्वतः च्या योगऊर्जेने प्राण त्यागले. हे सर्व काही ऐकल्यानंतर माता पार्वती विचारात पडतात. त्यावर ऋषी दधीची म्हणतात की, माते तुम्हांला या जन्मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून त्यांना पतीरूपात प्राप्त करून या समस्त सृष्टीचा उद्धार करायचा आहे व त्यासाठी भगवान विष्णूंनी मला येथे तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले आहे. पुन्हा एकदा मनुष्य जन्म घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या मूळरूपापासून अपरिचित आहात.
    माझे शंकर या क्षणी कुठे आहेत? असे पार्वतींनी विचारताच ऋषी दधीचि सांगतात की, तुम्ही सती म्हणून देहत्याग केल्यापासून आत्तापर्यंत अजूनही अमरनाथ गुहेत तुमच्या प्रतीक्षेत समाधीस्थ आहेत. हे ऐकून पार्वती चिंतीत होऊन, त्वरित अमरनाथ गुहेच्या दिशेने जाण्यासाठी निघतात व अमरनाथ गुहेत प्रवेश केल्यानंतर माँ पार्वतींचे पाऊल जसेजसे पुढे जाऊ लागते तसे मातेला त्या गुहेत त्यांच्या गतजन्माच्या म्हणजेच माता सतींच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घटना आठवायला लागतात. त्या घटना आठवून माता निराश होतात व शेवटी त्या भगवान शंकरांपर्यंत पोहोचतात.
    शंकरांपर्यन्त पोहोचल्यानंतर माता त्यांना समाधीतून उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात परंतु, शिवशंकर काही उठत नाही हे पाहून माता व समस्त देवलोक चिंतीत होतात. कारण माता सतींच्या देहांतानंतर भगवान शिव एकाकी होते आणी याच संधीचा फायदा घेऊन " तारकासुर " नावाचा एक राक्षस होता त्याने त्याच्या कठोर तपाने भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले होते व वरदान स्वरूप अमरत्वाचे वरदान मागितले परंतु, भगवान शिव त्याला अमरत्त्वाचे वरदान देऊ शकत नसल्याने त्याने शिवांकडून, माझा वध केवळ तुमचा पुत्रच करू शकेल इतर कोणीही नाही! असे वरदान मगितले त्यावर, शिवांनी तथास्तु म्हणत वरदान दिले.
    त्यामुळे जर भगवान शंकर समाधीतून उठले नाही तर त्यांचे माता पार्वतींशी मिलन होणार नाही व त्यांना पत्नीरूपात देखील स्वीकारणार नाहीत तसेच जर भगवान शंकरांचे पार्वतींशी विवाह झाला नाही तर त्या तारकासुर राक्षसाचा वध या समस्त सृष्टीत कोणीही करू शकणार नाही! या विचाराने देवराज इंद्र अतिचिंतीत झाले व यावर मार्ग काय असेल याचा विचार करू लागले. काही वेळाने देवराज इंद्राने स्वर्गलोकात कामदेवांना बोलावून घेतले व त्यांना, भगवान शंकरांची समाधी तुटण्यासाठी त्यांच्यावर शृंगाररुपी बाण सोडून मोहित करा असा आदेश देतात.
    काही वेळात अमरनाथ गुहेत कामदेव प्रवेश करतात व महादेवांवर शृंगाररूपी बाण सोडतात हे महादेवांना कळताच ते आपले तिसरे नेत्र उघडतात व त्या तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या आगीमुळे त्याच आगीत कामदेव भस्म होतात, त्यांची राख होती. या सर्व प्रकारानंतर महादेव अमरनाथ गुहेतून क्रोधित होऊन माता पार्वतींचे काहीच बोलणे न ऐकता निघून जातात. याने माता पार्वती चिंतीत होतात व निराश होतात. आपल्या पतींचे भस्म झाले आहे हे कळताच कामदेवांच्या पत्नी देवी रती तिथे काही वेळाने पोहोचतात.
    स्वतः समोर पतींची राख पाहून देवी रती या रडू लागतात व इंद्र देवाला श्राप देतात की, स्वर्गलोकालीत तुझे सिंहासन कधीच स्थिर राहणार नाही! नेहमी आशंकेने ग्रसित राहील. व पार्वती मातेंना, तु माझ्यापासून आई होण्याचे सुख हिरावून घेतले, माझ्या पतींच्या अंताचे एकमेव कारण तु आहेस! असे क्रोधित होऊन बोलतात. क्रोधाने देवी रती माँ पार्वतींना श्राप देतात की, तुला कधीच संतान होणार नाही. तेव्हा हे सर्व ऐकताच भगवान विष्णू तेथे येतात व देवी रतींना सांगतात की, देवी पार्वतींचा पुत्र झाला नाही तर तारकासुर चा वध कोणीही करू शकणार नाही! व देवी रतींना त्यांचा श्राप माघारी घेण्यास सांगतात यावर, देवी रती पार्वती मातेंना एक उपश्राप देतात की, पार्वती माता अवश्य बनेल परंतु, ती तिच्या संतान ला गर्भात धारण करू शकणार नाही! यावर मला तुमचा श्राप मान्य आहे, असे माँ पार्वती म्हणतात.
    काही क्षणाने माता त्यांच्या महालात परततात. काही दिवसांनी देवर्षी नारद पार्वती मातेला भेटतात व त्यांना सांगतात की, तुम्हांला महादेवांना प्राप्त करण्यासाठी अगोदर मानवी शरीरात असणाऱ्या १६ अशुद्धियांचा त्याग करावा लागेल. त्यासाठी तुम्ही  १६ सोमवार चे कठोर व्रत करा व महादेवांना प्रसन्न करून घ्या. देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून माता पार्वती १६ सोमवार चे कठोर व्रत सुरु करतात. 
    तसेच देवर्षी नारद मातेंना मानसरोवर यात्रा करण्याचा सल्ला देतात. काही काळाने माता मानसरोवर यात्रा प्रारंभ करतात. मातेच्या मानसरोवर यात्रेदरम्यान अनेक संकटे येतात परंतु, माता यात्रा सुरूच ठेवते. या यात्रेदरम्यान स्वतः महादेव देखील पार्वती मातेच्या परीक्षा घेतात, व महादेवांच्या आदेशावरून नंदी जी, सप्तऋषी देखील मातेच्या परीक्षा घेतात व माता सर्वांच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतात, हे ऐकून महादेव प्रसन्न होतात. 
    नंतर माता महादेवांना पतीरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या सुरु करतात. काळ सरू लागतो, तपस्येप्रती मातांची एकाग्रता व समर्पकता पाहून महादेव प्रसन्न होतात. कित्येक वर्षे माता तपस्येत लीन असतात. कित्येक वर्षांच्या मातांच्या कठोर तप- तपस्येवर प्रसन्न होऊन महादेव माता तपस्या करत असलेल्या ठिकाणी जातात व पार्वती मातेंना उठवून त्यांना सांगतात की, पार्वती माझ्याबद्दलची तुझ्या मनात असलेली समर्पक भावना, प्रेम, कठोर तप- तपस्या यांवर मी प्रसन्न झालो आहे व तुला या क्षणी मी पत्नीरूपात स्वीकारले आहे! हे ऐकून माता अतीप्रसन्न होतात. व माता ही सुखद बातमी त्यांच्या माता- पितांना सांगण्यासाठी महालात परतात. ही घटना ऐकून सर्व जन आनंदित होतात.
    काही दिवसांनी महादेवांकडून सप्तऋषी विवाहाचा प्रस्ताव घेऊन राजा हिमावन च्या महालात जातात. शिव- पार्वतींच्या विवाहाला सर्व जन अनुमती देतात. वर पक्षाकडून आलेल्या ऋषींमधील एक ऋषी म्हणतो की, एक उत्तम तिथी आहे. फाल्गुन माहतील कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजेच "शिवरात्री" होय. याच दिवशी माता सतींचा भगवान शिवांशी गंधर्व विवाह पद्धतीने विवाह संपन्न झाला होता. आता शिव- पार्वतीच्या या विवाहानंतर ही तिथी संपूर्ण सृष्टीत " महाशिवरात्री " म्हणून ओळखली जाईल.
    महाशिवरात्रि ला कैलास पर्वताहून महादेवांची बारात निघाली. वराने त्यांची प्रिय वस्तू वधु पक्षाला भेट देण्याची रिवाज असतो. म्हणून महादेव त्यांची प्रिय वस्तू म्हणजेच त्यांच्या गळ्यात असणारा "नाग" वधु पक्षाला भेट देतात. हे पाहून राणी मैनावती घाबरतात व चक्कर येऊन पडतात. तेव्हा "महादेव तुम्ही विवाहाच्या रिती- रिवाजानुसार तयार होऊन या" असे माता महादेवांना सांगतात. भगवान विष्णू महादेवांना सजवून तयार करून आणतात. महादेवांच्या त्या अति सुंदर, आकर्षक, मनमोहक रुपाला भगवान विष्णू  "चंद्रशेखर" नाव देतात. 
    परंतु, काही वेळाने वधु पक्षातील राणी मैनावातीच महादेवांना विनंती करतात की, "तुम्ही तुमच्या वास्तविक रूपातच आमच्या कन्येशी विवाह करा". राणी मैनावतच्या विनंतीवरून महादेव त्यांच्या वास्तविक रूपातच माता पार्वतींशी विवाह करतात. अशा प्रकारे शिव- पार्वतींचे मिलन होते. शिव- पार्वतींच्या अद्भुत विवाह सोहळ्यात समस्त देवि- देवता, भुत गण, साधू, इत्यादी आमंत्रित असतात. 

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी