श्री हनुमान जयंती मागील पौराणिक कथा
श्री हनुमंतांना महादेवांचे ११ वे रुद्रावतार म्हटले जाते.श्री हनुमान हे प्रभू रामांचे परमभक्त आहेत. हनुमानांचा जन्म वानरकुळात झाला. हनुमानांचा जन्म राजा केसरी व अंजना मातेच्या पोटी झाला. अंजना मातेंना विवाहपश्चात कित्येक वर्ष झाले परंतु, त्यानां एकही पुत्र नसल्याने त्या दुःखी होत्या. म्हणून त्या शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या करतात. अंजना मातेची घोर तपस्या पाहून महादेव प्रसन्न होतात व त्यांना वरदान मागण्यास सांगतात. यावर माता अंजना 'तुम्ही माझ्या पुत्ररूपात जन्म घ्या' असे वरदान मागतात. त्यावर महादेव तथास्तु म्हणतात.
सुमेरू येथे केसरी राजाचे राज्य होते. कलियुगात संकटांचे हरण करणारा एकमेव हनुमान जागृत देवता असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच बोलतात, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान. हनुमंतांना मारुती, पवनपुत्र, पवनसूत, बजरंबली, आंजनेय, केसरीनंदन, अशा अनेक नावाने ओळखले जाते. हनुमानांचे शस्त्र 'गदा' आहे. हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुलं पानं अर्पण केले जाते.
रामायण युद्धादरम्यान मेघनाथ ने लक्ष्मणावर बाणाने प्रहार केल्यानांतर लक्ष्मणाला मुर्छा आल्यानंतर त्यांचे प्राण केवळ संजिवनी बुटीने वाचणार होते आणि ही संजीवनी आणण्याकरिता हनुमानांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणून लक्ष्मणांचे प्राण वाचवले ते हनुमानांनी.
हनुमान यांचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी हनुमानांचा जन्म झाला. हा हनुमानांचा जन्म दिवस 'हनुमान जयंती' म्हणून हनुमान भक्त साजरा करतात. हनुमान यांचा जन्म नाशिक येथील 'अंजनेरी' येथे झाला.
एके दिवशी हनुमानांना खूप भूक लागली असता, माता अंजना त्यांच्यासाठी खावयास फळे आणायला जातात इतक्यात हनुमान सूर्याला लाल फळ समजून सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आकाशात झेप घेतात. हनुमान हे सूर्याला गिळंकृत असल्याचे इंद्रदेवाला कळते व पृथ्वीच्या रक्षणासाठी ते आपले शस्त्र 'वज्रास्त्र' हनुमानाच्या दिशेने सोडतात. वज्रास्त्रामुळे हनुमानांच्या हनुवटीवर प्रहार झाल्याने ते मुर्छित होतात. इतक्यात तिथे पवनदेव येतात व हनुमांनाना उठवण्याचा प्रयत्न करतात.
परंतु, हनुमान शुद्धीवर येत नसल्याने पवनदेव इंद्रदेवावर क्रोधित होतात व संपूर्ण सृष्टीतील प्राणवायू ओढून घेतात त्यामुळे, संपूर्ण प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते. अनेक देवी- देवतांच्या समजावण्यावरून इंद्रदेव हनुमंतांना मुर्छेतुन बाहेर काढतात, हनुमान शुद्धीवर येतात. हनुमान शुद्धीवर आलेले पाहून, पवनदेव शांत होऊन पुन्हा प्राणवायू पर्यावरणात सोडतात. तसेच तेव्हा हनुमंताला अनेक देवी- देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
हनुमानांच्या व्रात्यपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला त्यांच्याकडे असलेल्या शक्तीच्या विस्मृतीचा श्राप दिला. जाम्बुवंतांच्या विनंतीवरून त्या ऋषीने हनुमानाला एक उपश्राप दिला की, जो कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हा, तुला तुझ्या सर्व शक्तींचे आठवण होईल व सर्व शक्तीयाँ जागृत होतील. हनुमान चालीसा पठनाने हनुमानांना त्यांच्या शक्तियाँची आठवण येते. नित्य हनुमान चालीसा पठनाने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व आजार, दुःख, बाधा, दूर होऊन स्वतः मारुती त्यांची रक्षा करतात. माता सीताशोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जाम्बुवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तींची आठवण करून दिली.
पुढे श्री रामचंद्र वनवासात असताना हनुमानांची आणी श्रीरामांची भेट होते. हनुमानाने प्रभू रामांना वनवासात आणि युद्धादरम्यान फार मदत केली होती. हनुमानांच्या आणी वानरसेनेच्या बळावरच श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले व विजय देखील मिळवीला.
एका मान्यतेनुसार हनुमानांची भक्ती आणि समर्पणवृत्ती पाहून सीता मातांनी हनुमंताला अमरत्वाचे वरदान दिले. तो दिवस होता नरक चतुर्दशीचा.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment