हरितालिका पुजा विधी मराठी

    गणेश चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे, भाद्रपद शुद्ध तृतीयेला "हरितालिका" असे म्हणतात. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ते ठिकाण स्वच्छ करून तेथे  एका जागी चौरंग ठेवा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढा व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सजवलेल्या चौरंगावर वाळू आणून, माँ पार्वतींसह त्यांच्या सखी व शिवपिंड स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, बदाम, नाणे, फळ ठेवा.
    सर्वप्रथम स्वतःला हळद- कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. माँ पार्वतींना व त्यांच्या सखींना तसेच गणपतींना हळद- कुंकू लावावे. शिवपिंडीला हळद- कुंकू लावू नये व अर्पण देखील करू नये. कारण,  शिव पूजेत हळद- कुंकू वर्ज्य आहे (हळद- कुंकू वापरले जात नाही). त्यामुळे तुमच्याकडे जर पांढऱ्या चंदनाची पावडर किंवा चंदनाची पावडर असेल तर त्या चंदनाने तुम्ही शिवपिंडीला त्रिकुंड काढू शकता व चंदन अर्पण करू शकता. यानंतर सर्व देवांना नमस्कार करावा.घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडा व त्यांना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करा.
    सर्वप्रथम गणपतींची पूजा करावी कारण, श्री. गणेशांना प्रथमपूज्य मानले जाते. गणेश पूजन नंतर महादेव व सखी- पार्वतींची षोडशोपचार पूजा करावी.पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पण करावेत.
    चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, घंटी, समई, कापूर, हळद- कुंकू, चंदनाची पावडर, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, उदबत्ती, तुपाच्या किंवा तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, नारळ, फळे, खडीसाखर, गुळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, तसेच सुवासिन स्त्रियांनी माँ पार्वतींना सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. तसेच पूजेसाठी लागणारी विविधरंगी फुले, दुर्वा, व झाडांची पाने,  हे सर्व साहित्य पूजेसाठी आणावे व विधिवत अर्पण करावे.
    सर्व साहित्य अर्पण केल्यानंतर शिवपरिवाराची विधिवत पूजा करावी. शिवपार्वती व गणेश आरती करावी. नंतर हरितालिका तृतीयेची कथा वाचावी व एक माळ ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. अशाप्रकारे तुम्ही हरितालिका तृतीयेची पूजा करावी.
          Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी