वटपौर्णिमा पुजा विधी मराठी
ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. या दिवशी वडाच्या वृक्षाचे पुजन केले जाते म्हणून याला 'वटपौर्णिमा' असे म्हटले जाते.याच दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण यमदेवाकडून परत आणले होते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व जन्मोजन्मी मला हाच वर मिळावा म्हणून, वटवृक्षाची मनोभावे पुजा करतात तसेच उपवासही करतात.
स्त्रिया पुजेचे ताट घेऊन वटवृक्षाजवळ जातात. त्या ताटामध्ये दोरा, बांगड्या, कापूर, अत्तर, गुळ- खोबऱ्याचा नैवेद्य, विड्याची पाने, सुपारी, फळे, तुपाचा दिवा, दुर्वा, तांदूळ किंवा गहू, अगरबत्ती, एका भांड्यामध्ये पाणी, हे सर्व सामान घेऊन जातात व वडाच्या झाडाचे मनोभावे पुजा करतात.
सर्वात आधी वडाच्या झाडाला पाणी घालतात. नंतर तेथे दिवा ठेऊन अगरबत्ती ओवाळून धुप- दीप व नैवेद्य तसेच इतर साहित्यही अर्पण करतात. नंतर वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत दोरा झाडाभोवती गुंडाळतात.भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करतात.
तसेच तुम्हांला आणखी एखाद्या व्रताविषयी माहिती हवी असल्यास मला comment मध्ये कळवा.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment