अक्षय तृतीया माहिती मराठी
वैशाख शु. तृतीयेला "अक्षय तृतीया" म्हणतात. अक्षय म्हणजे, "नाश न पावणारे" असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. हिंदु धर्माच्या मान्यतानुसार, भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम पृर्थ्वीवर अवतरीत झाले तो हाच दिवस होय म्हणून, हा दिवस हिंदु धर्मात "परशुराम जन्मोत्सव" म्हणून साजरा केला जातो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारताच्या युद्धिष्ठीरांना "अक्षय पत्र" मिळाला. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे, अन्न कधीच संपले नाही. या पात्रातुन युद्धिष्ठीर आपल्या राज्यातील गरीब आणी भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करीत असे. या विश्वासाच्या आधारे या दिवशी प्राप्त केलेले पुण्य कधीच संपत नाही. हे वर्षानुवर्षे मानवाचे नशीब वाढवते.
महाभारताच्या काळी श्री कृष्णाने युद्धिष्ठीराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. देव आणी पित्र यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते.
या दिवशी भागीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन माता गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली असेही म्हटले जाते.
मान्यतानुसार या दिवशी माता अन्नपूर्णाचा जन्म झाला होता. या दिवशी विधीनुसार स्वयंपाक घर आणि अन्नधान्याची पूजा केली जाते. असे केल्याने, माता अन्नपूर्णाची कृपा घरावर कायम राहते.
काहींच्या मते कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ दिन याच दिवशी झाला होता.
Comments
Post a Comment