श्री गणेश जन्मकथा मराठी

    बुद्धीचे देवता,  सुखकर्ता, १४ विद्या आणी ६४ कला प्राप्त असलेल्या श्री.गणेशांचा जन्म मान्यतेनुसार, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. आज मी तुम्हा सर्वांना गणेश जन्मामागील एक कथा सांगणार आहे.
    कामदेवांचे रूपांतर भस्मात झाल्यांनंतर त्यांच्या अर्धांगिनी देवी रतींनी माँ पार्वतींना श्राप दिला होता की, तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. तुम्ही  पुत्र प्रेमापासून वंचित राहाल. परंतु ब्रह्मदेव व विष्णू देवांच्या विंनतीवरून देवी रतींनी मातेला एक उपश्राप दिला की, तुम्ही आई बनाल परंतु, कोणताही शिशु तुमच्या उदरात जन्म घेऊ शकणार नाही. त्यावर माँ पार्वतींनी त्यांचा श्राप स्वीकारला. 
    माँ पार्वतींचे भगवान शंकरांशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांना पुत्राची कमतरता भासू लागते. स्कंदपुराणाच्या ब्रह्मखंडातील कथेनुसार, माँ पार्वतींनी स्वतःच्या मळापासून एका सुंदर बालकाचा पुतळा बनविला. काही वेळाने त्या पुतळ्यात प्राण आले व त्या पुतळ्याचे रूपांतर एका आकर्षक व सुंदर पुत्रामध्ये झाले.
   माँ पार्वतींनी त्या पुत्राला, 'तु माझा पुत्र आहेस' असे सांगितले असता, त्या पुत्राने माँ पार्वतींना मला भूक लागली आहे, माते मला काहीतरी खायला दे असे, म्हणतात. मग माँ पार्वती त्यांच्या पुत्राला लाडू, मोदक असे पदार्थ खायला देतात व तो पुत्र अन्न ग्रहण करतो. माँ पार्वती त्या बालकाचे नाव 'विनायक' असे ठेवतात.
    एके दिवशी माँ पार्वती स्नानास जात असताना त्यांनी आपल्या पुत्राला स्नानकक्षा बाहेर पहारा द्यायला सांगतात व 'काही झाले तरीही कोणालाही आत येऊ देऊ नकोस' असे सांगतात. विनायकही आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतात.
    काही वेळाने तिथे भगवान शंकर येतात. त्यांना पार्वती मातेंशी काहीतरी महत्वाचे बोलायचे असते परंतु, बालविनायक काही केल्या भगवान शंकरांना स्नानगृहात जाण्याची परवानगी देत नसल्याने तिथे अनेक देवी- देवता येतात व विनायकाला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु, विनायक काही केल्या ऐकत नसल्याने भगवान शंकराचा राग अनावर होतो.
    अशा वेळी रागाने विनायक शंकरांना युद्ध करण्यासाठी आवाहन करतात व क्रोधित झालेले भगवान शंकर आपले शस्त्र त्रिशुळाने विनायकावर प्रहार करतात. भगवान शंकरांच्या त्रिशुळाने विनायकाचे शिष (डोके) धडापासून वेगळे होताच विनायक मोठ्याने ' माँ ' म्हणतात व त्वरित  स्नानगृहाबाहेर माँ पार्वती येतात. माँ पार्वतींसमोर भगवान शंकरांच्या त्रिशुळामुळे विनायकाचे शिष धडापासून वेगळे होते. मान्यतानुसार आजही उत्तराखंड मधील गंगोलीहाट पर्वतरांगांमधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नामक एक गुहा आहे. याच गुहेत गणपतीचे म्हणजेच विनायकाचे मूळ शिष ठेवले असे, सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती, अशी मान्यता आहे.
    आपल्याच पतीने आपल्या पुत्राचे प्राण घेतले हे पाहून माँ पार्वती अत्यंत क्रोधित होतात व शंकरांना माझ्या पुत्रास पुनर्जीवित करा असे म्हणतात. परंतु, भगवान शंकर 'नाही' म्हणल्याने, देवी अत्यंत क्रोधित होउन त्यांचे  'सिद्धिदात्री रूप' धारण करतात. त्या सृष्टीचा विनाश करणार आहेत हे भगवान शंकरांना समजते व भगवान शंकर त्यांच्या गणांना बोलावतात. तुम्ही सर्वजण त्वरित कैलासाबाहेर जा आणि, 'तुम्हाला सर्वप्रथम जो सजीव प्राणी उत्तरेकडे मुख करून असेल त्या प्राण्याचे शिष त्याच्या स्वीकृती नुसार कैलाशावर घेऊन या' असे सांगतात व सर्व गण कैलासाबाहेर शोधासाठी निघतात.
    सर्वप्रथम त्या सर्वांना एक हत्ती उत्तर दिशेकडे मुख केलेला दिसतो व त्या हत्तीच्या स्वीकृती नुसार तो आपले प्राण त्यागतो. सर्व जण हत्तीचे शिष घेऊन कैलाशावर येतात व भगवान शंकर त्या हत्तीचे शिष विनायकाच्या शरीरावर ठेवतात. काही वेळातच विनायक पुनर्जीवित होतो व माँ पार्वतींचा राग शांत होतो. तेव्हा भगवान शंकर विनायकाला पुनर्जीवित केल्यानंतर त्यांना गणांचा ईश म्हणजेच 'गणेश' नाव देतात व संपूर्ण जगात तु 'गणेश' नावाने ओळखला जाशील असे सांगतात.
    श्री.गणेशांना दोन पत्नी आहेत, रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी आणी सिद्धी दोन्हीही बहिणी आहेत. पाश आणि अंकुश ही गणेशांची शस्त्रे आहेत.श्री. गणेशांचे वाहन मुषक म्हणजेच उंदीर आहे. श्री गणेशांची अनेक नावे आहेत. तसेच श्री गणेश हे प्रथमपूज्य आहेत.
             Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी