श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा
भगवान विष्णूंनी द्वापारयुगात दृष्टांच्या संहारासाठी पृथ्वीलोकावर 'कृष्ण' नावाने अवतार घेतला. अवतार म्हणजे, पुनर्जन्म घेतला. श्रीकृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतरंगातील आनंदमय असे तत्त्व आहेत. श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री १२ वाजेच्या आसपास रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला.
कृष्णाचा मामा कंस याने, देवकीच पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून स्वतःची सख्खी बहीण देवकीला व देवकी मातेचे पती वासुदेव यांना कैदेत ठेवलं होत. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. देवकीच्या प्रत्येक नवजात बालकाला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. अशा प्रकारे कंसाने देवकी आणि वासुदेवाची सात अपत्ये ठार केली होती.
देवकीच्या पोटी आठव्या अपत्याचा जन्म झाला, ते आठवे अपत्य श्रीकृष्ण होते. श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यावेळी तुरुंगाचे रक्षक झोपी गेले होते या संधीचा फायदा घेऊन वासुदेवांनी आपले आठवे अपत्य मारले जाऊ नये, म्हणून श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांना गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे सुपूर्त केलं होतं. श्रीकृष्णांना 'माखनचोर' म्हणूनही ओळखले जाते. श्रीकृष्णांना 'माखन' म्हणजे 'लोणी' अत्यंत प्रिय आहे.
भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक भाविक उपवास, अनुष्ठान करतात.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment