श्रावण सोमवार व्रत मराठी

      श्रावण मासात येणाऱ्या प्रत्येक सोमवार ला 'श्रावणी सोमवार' म्हटले जाते. भारतात हिंदू धर्मात  अनेक शिवभक्त मोठया संख्येने श्रावणी सोमवार चे उपवास, व्रत करतात व महादेवांना प्रसन्न करतात, त्यांची पूजा करतात. श्रावण मास भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. भगवान शंकरांचे श्रावण सोमवार चे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. हे व्रत करणाऱ्या भक्तांवर महादेव शीघ्र प्रसन्न होतात.
    या व्रतामध्ये भगवान शिवशंकरांचे पूजन करून एका वेळचे भोजन ग्रहण केले जाते.सोबतच भगवान शंकर आणि माँ पार्वतींचे स्मरण करत पुजा केली पाहिजे. या व्रताने भगवान शिव प्रसन्न होऊन मनोवांछित वरदान देतात. श्रावण मासातील प्रत्येक सोमवार ला श्री. गणेशांचे, शिव जी व पार्वती मातेची पुजा करण्याचे विधान आहे.
    सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान आदी निवृत्त झाल्यावर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सर्वप्रथम आपण श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा कारण, कोणत्याही व्रताचा संकल्प हा त्या व्रताचा महत्त्वपूर्ण भाग असतो. संकल्प हा केवळ पहिल्याच श्रावणी सोमवार ला करावा. दर सोमवारी संकल्प करू नये. आपण ज्या ठिकाणी पुजा मांडणार आहोत तिथे, स्वच्छता करावी. पूजेसाठी खालील प्रमाने साहित्य आणावे.
    गंगाजल, जल, घी, दूध, दही, पंचामृत, चौरंग, पांढरे वस्त्र चौरंगावर ठेवण्यासाठी, पांढरे चंदन, बेलपत्र, धोतऱ्याचे फुल, पांढरी व लाल फुले, दुर्वा, सुपारी, विड्याचे पान, दक्षिणा देण्यासाठी काही पैसे,अगरबत्ती,समई, निरंजन,तांब्या,कलश, कलावा, जनेऊ, रोली, तांदूळ, माँ पार्वती व श्री. गणेशांसाठी हळद- कुंकू, तूप अथवा तेलाचा दिवा, कापूर, धुप- दीप.
    सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी चौरंग मांडणार आहोत तिथे गंगाजल शिंपडावे. चौरंगाभोवती सुबक रांगोळी काढून घ्यावी. चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरूण घ्यावे. सर्वप्रथम चौरंगावर तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावावा. एक मोठे ताट घ्यावे, त्यात श्री.गणेश आणी शिव जी व माँ पार्वतींना पंचामृताने अथवा जलाभिषेक करावा. महादेवांना पांढऱ्या चंदनाने त्रिकुंड काढावे व चंदन अर्पण करावे. 
    शिवशंकरांना हळद- कुंकू लावू नये व अर्पण देखील करू नये. कारण, शिवपूजेत हळद- कुंकू वर्जित आहे. माँ पार्वतींना व श्री. गणेशांना हळद- कुंकू लावावे. शिव परिवाराला कलावा रुपी वस्त्र अर्पण करावे. माँ पार्वतींना व गणेशांना जनेऊ व रोली अर्पण करावे. सर्वांना फुल अर्पण करावे. शिवशंकरांना विड्याचे पान, सुपारी अर्पण करावे.
    सांगितल्याप्रमाणे विधीनुसार पूजन करून घ्यावे. शिवशंकरांना ११,२१,५१ या स्वरूपात जेवढे शक्य असेल तेवढी दक्षिणा द्यावी. तसेच फळ अर्पण करावे. पूजेच्या शेवटी श्रावण सोमवार ची कथा- महात्म्य पठण करावे. रुद्राक्षाची अथवा जी माळ तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याने, 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा एक माळ जप करावा. शिवशंकरांची धुप-दिप व कापूर आरती करून पुजा संपन्न करावी व दिवसभर उपवास करावा.
    दिवसा एक वेळचे भोजन ग्रहण करावे व रात्री च्या वेळी तुम्ही उपवास सोडू शकता. श्रावणी सोमवार च्या दिवशी दोन वेळ म्हणजे सकाळ- संध्याकाळ शिवपरिवाराचे विधीनुसार पूजन करावे. काही शिवभक्त श्रावणी सोमवार 'निराहार' व्रत म्हणजे, भोजन ग्रहण न करता दिवसभर उपवास  करतात तर, काही जण 'निर्जळी' व्रत म्हणजे, दिवसभर जल ग्रहण करत नाहीत. अशा अनेक प्रकारे श्रावणी सोमवार चे व्रत करतात.
    अशा प्रकारे श्रावणी सोमवार चे व्रत केले जाते व अंतिम सोमवार ला श्रावणी सोमवार व्रताचे उद्यापन केले जाते.
   जर तुम्हांला एखाद्या व्रताची माहिती हवी असल्यास मला comment box मध्ये कळवा.
          
            Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी