श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती।
वानरी अंजनीसूता, रामदुता प्रभंजना ।।१।।
 महाबली प्राणदाता, सकळां उठवी बळें।
सौख्यकारी दु:खहारी धूर्त वैष्णव गायका ।।२।।
दीनानाथा हरिरुपा, सुंदरा जगदंतरा।
पातालदेवताहंता, भव्यसिंदूर लेपना ।।३।।
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।।४।।
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें।
कालाग्नि, देखतां कांपती भयें ।।५।।
ब्रह्मांडें माइलीं नेणों, आंवलें दंतपंगती।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाला, भ्रूकुटी ताठिल्या बळे।।६।।
पुच्छ तें मुरडीलें माथां किरीटी कुडलें बरीं‌।
सुवर्णकटिकांसोटी, घंटा किंकिमिनागरा ।।७।
ठकारे पर्वतऐसा, नेटका सडपातलू।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्दुल्लतेपरी ।।८।।
कोटीच्या कोटी उडाणें, झेपावें उत्तरेकडे।
मंद्राद्रीसैरिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती।
मानसी टाकिलें मागें गतीसी तुळणा नसे ।।१०।।
अणूपासोनि ब्रह्मांडा एवडा होत जातसे।
तायसी तुळणा कोठे मेरूमंदार धाकुटे ।।११।।
ब्रह्मांडाभोवतें वेढे, वज्रपुच्छें करूं शके।
तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहतां नसे ।।१२।।
आरक्त देखिलें डोळां, ग्रासलें सूर्यमंडला। 
वाढतां ढें, भेदिलेंशून्यमंडला ।।१३।।
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही।
पावती रूपविद्यादि, स्तौत्रपाठेंकरूनियां ।।१४।।
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही।
नासतीतुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।।१५।।
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकलागुणें ।।१६।।
रामदासीं अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू।
रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।
इति श्री रामदासकृत सकटनिरसनं नाम मारूतीस्तौत्रं संपूर्णम् ।।


Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी