माता आदिशक्ती प्रकृती

    देवी पुराणात (महाभागवत) वर्णन केले आहे की, जगदंबिका पूर्णा प्रकृतीने ब्रह्मा, विष्णु आणि महेश(शिव) या तिघांची निर्मिती केली आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्यास सांगितले. त्यांनी ब्रह्मदेवाला त्या सृष्टीचे निर्माता, विष्णुंना पालनहार, आणि महेश म्हणजेच शिवांना संहारक बनविले. सृष्टी निर्माण करण्यापूर्वी, या तिघांनी ती सर्वोच्च शक्ती, पूर्णा प्रकृती, पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या सुरु केली. या तिघांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन जगदंबिका या विष्णुजींना आदि महालक्ष्मी रूपात,‌ ब्रह्माजींना आदि सरस्वती रूपात व शिवजींच्या कठोर तपामुळे स्वतः जगदंबिका या आदिशक्ती प्रकृती, पत्नी म्हणून  शिवांना प्राप्त झाल्या.
    परंतु, सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवांना मानवनिर्मिती तसेच इतर प्रणिनिर्मिती साठी सर्वोच्च शक्तीची आवश्यकता होती म्हणून, ब्रह्मदेवांनी आदिशक्तींना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले व तेथे सर्वोच्च शक्ती माता आदिशक्ती प्रकट झाल्या. ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून व सृष्टी कल्याणासाठी त्यांनी शिवांपासून विभक्त होऊन ब्रह्माजींना सृष्टी निर्मिती मदत केली. सृष्टी निर्मितीनंतर ब्रह्मदेव माता आदिशाक्तिनां शिवांकडे सोपवण्यास जातात परंतु, शिवजी माता आदिशाक्तिनां पत्नीरूपात स्वीकारात नसल्याने, माता आदिशाक्ति या ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या सृष्टीत मानव रूपात जन्म घेतात.
    माता आदिशक्तींचा‌ प्रथम अवतार म्हणजेच 'माता सती' होय. काही कारणांमुळे शिवसती चा विवाह यशस्वी न झाल्याने याच सतीने पुढे शिवांना पतीरूपात प्राप्त करण्यासाठी अनेक जन्म घेतले. मान्यता आहे की, माता सतींनी शिवजींना पतीरूपात प्राप्त करण्यासाठी १०७ वेळा मानवी जन्म घेतला. माता सतींचा १०८ वा जन्म म्हणजे 'माता पार्वती' होय. माता पार्वतींच्या कठोर तपश्चर्येमुळे १०८ व्या जन्मात शिवशंकर त्यांना पत्नीरूपात स्वीकारतात. दसमहाविद्या या आदिसति पार्वतींचेच रूप आहे. नवदुर्गा हे देखील आदिशक्ती पार्वतींचे रूप आहे. 
    माता सती माहिती भाग १ मध्ये माता सतींबद्दल माहिती दिलेली आहे. blog वाचला नसल्यास जरूर वाचावे. 
            thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी