त्रिपुरारी पौर्णिमा महत्वकथा
त्रिपुरारी पौर्णिमा हा परमात्म्याच्या प्रत्येक स्वरुपाशी विश्वाला ओळख करून देणारा एकमेव अद्वितीय शुभ दिवस मानला जातो.
१) परमात्म्याने शिव रूपात त्रिपुरासुराचा वध केला तो हाच दिवस.
२) हिमालयकन्या माँ पार्वतींच्या कठोर तपश्चर्येला भुलून त्यांच्या समोर शिवशंकर उभे राहिले तो हाच दिवस.
३) श्री.गणेशांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली ती ह्याच दिवशी.
४) भगवान कार्तिकेयांचे देवांचा सेनापती म्हणून निवड केली ती ह्या दिवशी.
५) देवगुरू बृहस्पतींनी प्रभु दत्तात्रेयांच्या श्रीपादश्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती या अवताराची घोषणा केली तो हा दिवस.
६) भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र आटविला तो ह्याच दिवशी.
७) मारुतींनी श्रीराम व सीता मातेचे आपल्या हृदयातील अस्तित्व छाती फाडून समस्त विश्वासाठी खुले केले तो हाच दिवस.
८) श्री विठ्ठल हे त्यांचा भक्त पुंडलिकाच्या घरी येऊन विठेवर उभे राहिले व पुंडलिकाच्या आग्रहावरून त्या विठेवर मूर्तिरूपात स्थापन झाले ते ह्याच दिवशी.
अशी ही दिव्य त्रिपुरारी पौर्णिमा.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment