भाऊबीजे मागील पौराणिक कथा मराठी

    सूर्यादेवांची पत्नी छाया यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमराज आणि यमुना दोघेही सख्खे बहीण- भाऊ आहेत. यमुना देवी ने एकदा यमराजांना घरी जेवण्यासाठी बोलावले असता, यमराज व्यस्त असल्यामुळे ते बहिणीकडे जाऊ शकले नाहीत.
    एकदा कार्तिक द्वितीयेला आपला भाऊ यमराज अचानक आपल्या दारात आलेला पाहून यमुना खूप आनंदित झाली. तीने यमराजांचे प्रेमाने स्वागत केले आणि भोजन वाढले. बहिणीचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून यमराज खुश होतात व बहीण यमुना ला वरदान मांगण्यास सांगतात. तेव्हा यमुना म्हणतात की, आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल व तिच्याकडून राखी बांधून घेईल व जी बहीण आपल्या भावाला मनोभावे प्रेमाने जेऊ घालेल त्यांना तुम्ही दीर्घायुष्य, सुख- समृद्धी प्रदान कराल.
    यावर यमराज तथास्तु म्हणत यमपुरीला निघाले. या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिचे आदरातिथ्य स्वीकारतो त्याचे आयुष्य वाढते. त्याला व त्याच्या बहिणीला यमाचे भय राहत नाही. अशी ही भाऊबीजे मागील पौराणिक कथा.
             Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी