शिव सती विवाह सोहळा
प्रजापती दक्ष त्याच्या कन्येचा म्हणजेच, माता सतींच्या विवाहासाठी स्वयंवर आयोजित करतो. त्या स्वयंवरामध्ये अनेक राज्यांतून वर (नवरा मुलगा) येतात. दक्ष राजाच्या मनात भगवान शिवांबद्दल असलेल्या शत्रुत्वामुळे तो भगवान शिवांना स्वयंवरमध्ये आमंत्रित करत नाही. तसेच तो ठरवतो की, सतीच्या विवाहात शिवांची द्वारपालवाली मूर्ती बनवावी जेणेकरून, या स्वयंवरमध्ये येणाऱ्या- जाण्याऱ्या लोकांचे स्वागत शिवांची मूर्ती करेल व स्वतः च अपमानित होईल असे दक्ष ला वाटते.
स्वयंवराची सुरुवात होते. तेथे माता सती वरमाला घेऊन येतात. राजा दक्ष मातेला वर निवडण्यास सांगतात व त्या वराला वरमाला घालण्यास सांगतात. माता सती सगळीकडे भगवान शिवांना शोधत असतात परंतु, भगवान शिव कोठेच दिसत नसल्याने माता सती चिंतीत होतात. दुसरीकडे राजा दक्ष पुन्हा एकदा ओरडून सांगतो, "सती योग्य वराचे चयन कर, त्वरित".
हे ऐकून माता सती स्वयंवराच्या प्रत्येक प्रवेश द्वारापाशी पाहतात. तेथे त्यांना भगवान शिवांची उभी असलेली द्वारपालवाली मूर्ती दिसते, माता सती खुश होतात. तेव्हा माता सती म्हणतात, "ही वरमाला मी त्यालाच प्रदान करेल, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलंय" असं म्हणतात व त्या भगवान शिवांच्या मूर्तीलाच वरमाला सुसज्जीत करतात.
भगवान शिवांना त्या आवाहन करतात तेथे येण्यास. भगवान शिवांना वरमाला घातल्यानंतर तेथे मूर्तीच्या ठिकाणी भगवान शिव प्रकट होतात. परंतु, राजा दक्ष विवाहाशी सहमत नसतो. तिथे ब्रह्मदेव व विष्णुदेव प्रकट होतात. दोघांच्या आदेशावरून, दक्ष विवाहाला संमती देतो व सर्वांच्या साक्षीने शिव- सती विवाह सोहळा हा गंधर्व पद्धतीने पार पडतो. हाच 'शिव- सती विवाह सोहळा' पुढे शिवरात्री म्हणून अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.
thanks for visiting the blog
Comments
Post a Comment