आषाढ एकादशी माहिती

      आषाढ माहतील एकादशी फार पवित्र असते म्हणून या एकादशीला 'महाएकादशी' देखील म्हटले जाते. विठुमाऊलींच्या भेटीसाठी दुरहून अनेक भाविक दर्शनासाठी जातात. या एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहुतून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, सासवडहुन सोपानदेवांची, पैठणहून एकनाथांची पालखी निघते. एकादशीच्या व्रतामुळे आत्मिक शांती आणी मोक्ष प्राप्ती होते. आषाढी एकादशीच्या दिवशी माऊलींचे नामस्मरण करून उपवास करतात.
    एकादशी मागील कथा :
    मृदिमान्य नावाच्या दैत्याने भगवान शिवांची कठोर आराधना केली. श्री महादेवांनी प्रसन्न होऊन, तु कोणाकडूनही मरणार नाहीस पण, एका स्त्री द्वारे तुझा अंत होईल, असे वरदान दिले. असे वरदान मिळताच राक्षसाने सर्व देवांचा पराभव केला. तेव्हा सर्व देव श्री शंकरांकडे आले पण श्री शंकरानीं त्या दैत्याला वरदान दिले असल्यामुळे, त्यावर काहीही उपाय नव्हता. मग सर्व देव श्री शंकरांसह एका गुहेत जाऊन लपून बसले. तिथे सर्व देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली, तिचे नाव एकादशी. तीने त्या दैत्याला ठार करून त्याचा अंत केला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत करण्यास सुरुवात झाली.
    तुम्हांला एकादशीची अन्य एखादी कथा माहिती असल्यास मला comment box मध्ये कळवा.
           
            Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी