बुधवार व्रत मराठी
बुधवार हा बुध देवांचा प्रिय दिवस मानला जातो. ज्या प्रमाणे शिवभक्त सोळा- सोमवार, श्रावण सोमवार, प्रदोष सोमवार व्रत, मारुती भक्त मंगळवार चे व्रत, दत्तभक्त केशरी (पिवळे) गुरुवार चे व्रत करतात त्याप्रमाणे, बुधभक्त बुधवार चे व्रत करतात.
बुधवार व्रत केल्याने बौद्धिक विकास, घरामध्ये धन आणी सुख समृद्धी येते. बुध ग्रहाचे चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी देखील बुधवार चे व्रत केले जाते.
पूजा सामग्री :- बुधवार व्रत करण्यासाठी खालील सामग्री (सामान) लागते.
१] बुध देवांची मूर्ती किंवा प्रतिमा
२] एक मोठे ताट
३] हिरवे वस्त्र
४] पंचामृत
५] पान, सुपारी, लौंग, इलायची
६] कापूर आणी पूजेसाठी पात्र
७] धूप- दीप व प्रसादासाठी साठी गुळ.
बुधवार व्रत पूजा विधी :- बुधवार च्या दिवशी व्रत करावे. बुधवारी प्रातः लवकर उठून स्नान- आदी निवृत्त होऊन नंतर बुधवार व्रताचा मनोभावे संकल्प घ्यावा. या दिवशी पूजेच्या वेळी बुधवार व्रत कथा पठण करून आरती करून घ्यावी. या दिवशी वाद- विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. सूर्यास्तानंतर पूजा करून भगवान बुध देवाला धूप, दीप, दही व गुळ अर्पण करावे. पूजा समाप्ती नंतर प्रसाद सर्वांना वाटून, स्वतः सेवन करावे.
Comments
Post a Comment