श्री गणेश बुधवार व्रत मराठी

       बुधवार हा श्री गणेशांना समर्पित आहे. गणेश भक्त हे मनोभावे बुधवार व्रत करताना पाहावयास मिळतात. बुधवार व्रत करताना पहिल्या बुधवार पासून ते किमान सातव्या बुधवार पर्यंत हे व्रत केले जाते. बुधवार व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात आनंद, सुख- शांती, यश सर्व काही प्राप्त होते.
      सकाळी लवकर उठून स्नान आदी निवृत्त झाल्यानंतर स्वछ वस्त्रे परिधान करावीत. नंतर तांब्याच्या ताटात श्री गणेशांची मूर्ती स्थापन करावी.
पूजा करताना पूर्व दिशेकडे मुख करून पूजा केलेली उत्तम. पूर्व दिशा शक्य नसल्यास उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी. सर्व प्रथम बुधवार व्रताचा संकल्प घ्यावा.
    श्री गणेशांची स्थापना केल्यानंतर त्यांना पंचामृत अथवा शुद्ध जलाभिषेक करावा. धूप- दीप, अगरबत्ती दाखवून व फुले, फळे, तांदूळ, रोली, हिरवे वस्त्र, पानाचा विडा, सुपारी, लवंग, गुलाल, मूग डाळ, तसेच कापूर, लाल चंदन याने पूजा करून घ्यावी. दुर्वा ही गणेशांना अत्यंत प्रिय असल्याने श्री गणेशांना दुर्वा मनोभावे अर्पण कराव्यात. श्री गणेशांची आरती करावी व शक्य असल्यास अथर्वशीर्षाचे पठण जरूर करावे. एक माळ म्हणजेच १०८ वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा  एकाग्रतेने जप करावा. पूजेच्या शेवटी श्री गणेशांना मोदक अर्पण करावे.
      
    जर तुम्हांला एखाद्या व्रताची माहिती हवी असल्यास मला comment box मध्ये कळवा.    
         
            Thanks for visit the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी