मासिक दुर्गाष्टमी व्रत मराठी
माँ आदिशक्ती पार्वतींचेच रूप म्हणजे माँ दुर्गा होय. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षातील अष्टमीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते.मासिक दुर्गाष्टमीला विधीनुसार माँ दुर्गांची उपासना केली जाते. माँ दुर्गांची पूजा- व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माँ ने चंड- मुंड राक्षसाचा वध केलता. माँ पार्वतींची पूजा अष्टमी च्या दिवशी केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
या दिवशी प्रातः लवकर उठून स्नान आदी निवृत्त होऊन सर्वप्रथम माँ दुर्गांच्या समोर मासिक दुर्गाष्टमी व्रताचा संकल्प घ्यावा. पूजेचे ठिकाण स्वछ करून घ्यावे. पूजेस्थळी गंगाजल टाकून ती जागा पवित्र करून घ्यावी. त्यानंतर एक चौरंग घ्यावा. त्या चौरंगावर लाल रंगाचे एक वस्त्र पसरवावे. त्यावर मातेची मूर्ती स्थापन करावी. दिवा प्रज्वलित करावा. मातेला नमस्कार करावा. मातेला अक्षत,पान, सुपारी,इलायची, सिंधुर,लाल चंदन आणी लाल फुले अर्पण करावीत. आरती करून घ्यावी.
"सर्व मांगल मांगल्ये, शिवे सर्वथा साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते"
या मंत्राचा जप करावा. जप करून झाल्यानंतर मातेला अक्षत व लाल फुले अर्पण करावीत.नंतर दुर्गा चालीसाचे पठण करावे. काही भक्त निर्जळी व्रत तर काही भक्त फळ सेवन करून व्रत करतात.
< पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे आवश्यक आहे >
< मासिक दुर्गाष्टमी व्रताची पूजा करताना पूजेमध्ये तुळशी, आवळा, दुर्वा, मदार व आक या फुलांचा हार वापरू नये >
अशाप्रकारे मासिक दुर्गाष्टमीचे व्रत केले जाते.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment