सोम प्रदोष व्रत कथा मराठी

∆ कथा सोम प्रदोष व्रताची :-       
      
       पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी राहत होती. तिच्या पतींचं निधन झालं होत. तिला पोटा- पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी बाहेर जावं लागायचं. ती स्वतः आपल्या मुलाला भिक मागून खाऊ घालायची.एक दिवस ब्राह्मणी घरी परतत असतांना तिला एक मुलगा जखमी अवस्थेत व्हिवळत‌ असल्याचे आढळले. ब्राह्मणीने त्याला तिच्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला केलता आणी त्याच्या वडिलांना पकडून आणले होते आणी राज्याचा ताबा घेतला होता, म्हणून तो इकडे- तिकडे फिरत होता.
     राजकुमार ब्राह्मणांच्या घरात त्यांच्या पुत्राबरोबर राहू लागला आणी एक दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले आणी ती त्यावर मोहित झाली.दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई- वडिलांना राजकुमाराला भेटण्यासाठी घेऊन आली. त्यांना देखील राजकुमार आवडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरानीं अंशुमतीच्या आई- वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की, राजकुमार आणी अंशुमतीचे लग्न लावून द्या. त्यांनीही तेच केले.
     ब्राह्मणी प्रदोष व्रत करत असे.आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणी गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले आणी आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले.
   ज्याप्रमाणे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणी ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले, त्याच प्रमाणे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच, सोम प्रदोष व्रताचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे.
    
   जर तुम्हांला एखाद्या व्रताची माहिती हवी असल्यास मला comment box मध्ये कळवा.

          Thanks for visiting the blog 

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी