सोम प्रदोष व्रत मराठी

      जर कोणत्या महिन्यात त्रयोदशी सोमवारच्या दिवशी आली तर तीला सौम्य/सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष च्या दिवशी शिवपूजेला विशेष महत्त्व असते. प्रदोष व्रतात संध्या प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केली जाते. प्रदोष काळ म्हणजेच, सूर्यास्तापासून ४५ मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या ४५ मिनिटनंतर पर्यंतचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो.
    सकाळी लवकर उठून स्नान आदी निवृत्त होऊन श्री शिवांसमोर सोम प्रदोष व्रताचा संकल्प घ्यावा. संकल्प घेतल्यानंतर महादेवांना पंचामृत अथवा जालाभिषेक करावा. शिवांना प्रिय असलेले धोतऱ्याचे फुल व बिल्व पत्र अर्पण करावे. शंकरांची आरती करून घ्यावी व नंतर प्रदोष व्रत कथा पठण करावी व शक्य नसल्यास ऐकावी. एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा तसेच महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. महादेवांना नैवेद्य अर्पण करावे.
    पूजेसाठीचे साहित्य :- धोतऱ्याचे फुल, बिल्व पत्र, जल अथवा पंचामृत, अक्षदा, धुप- दीप, अगरबत्ती, धोतऱ्याच्या फुलासोबत कन्हेरचे फुल अथवा इतर रंगीत फुल, पानाचा विडा, सुपारी,फळ, आदी साहित्य..,
    मात्र शिवपूजेत भक्तांनी हळद, कंकू, तुळसी, केतकीचे फुल शिवजींना अर्पण करू नये.
    
   प्रदोष व्रत अनेक प्रकारचे असते. ते खालील प्रमाणे :- 

१) रवी प्रदोष व्रत- या व्रताने दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य प्राप्त होते.
२) सोम प्रदोष व्रत- सर्व मनोकामना पूर्ण होतात व जीवनात सुख- समृद्धी येते.
३) मंगळ/भौम प्रदोष व्रत- रोगातून मुक्ती मिळते.
४) बुध प्रदोष व्रत- सर्व इच्छा पूर्ण होतात.
५) गुरु प्रदोष व्रत-  शत्रुंवर मात मिळते.
६) शुक्र प्रदोष व्रत- सुख- समृद्धी, आणी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात.
७) शनि प्रदोष व्रत- या व्रताने पुत्रप्राप्ती होते अशी पौराणिक मान्यता आहे. 
 
   जर तुम्हांला एखाद्या व्रताची माहिती हवी असल्यास मला comment box मध्ये जरूर कळवा.


Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी