माझी जिवलग मैत्रीण मनोगत
आजच्या दिनी मी माझ्या जिवलग मैत्रीण वर मनोगत मांडतेय. माझ्या कॉलेज मध्ये अनेक मैत्रिणी आहेत परंतु त्या सर्वांमध्ये माझी जिवलग मैत्रीण ज्ञानेश्वरी आहे. आम्ही एकमेकांना ज्ञानू व आरु नावानेच बोलतो. असं म्हणतात की जी नाती रक्ताची नसूनही आपली त्यांच्याशी नकळत ओळख होऊन एक अतूट नाते निर्माण होते तिला मैत्री असे म्हणतात.
कोणीही आपले नात्यातले नसताना अचानक आपले होते ती असते मैत्री.
आई- बाबां पेक्षाही जिच्यासोबत एखादी घटना सांगावीशी वाटते ती असते मैत्री.
परिवारा- पेक्षाही आपल्याला जास्त ओळखते ती असते मैत्री.
मैत्री हसणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, ती भांडनारी का असेना पण नेहमी साथ देणारी असावी.
मैत्रीची व्याख्या वेगवेगळी असते.मैत्री करायची असेल ना तर पाण्यासारखी निर्मळ अशी, दूर जाऊनही क्षणो- क्षणी आठवण येईल अशी मैत्री करावी. खरी मैत्री तिच असते जी वाईट काळात सुद्धा साथ देईल. मी कोणत्याही अडचणीत असले की ती मला नेहमी साथ देते. माझ्या आयुष्यात माझ्या जिवलग मैत्रिणीची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
कोणाच्या मते मैत्री ही फक्त मैत्रीच असते तर काही जण जगामध्ये मैत्रिणी शोधतात पण आम्ही मैत्रीण मध्ये जग शोधते. माझी कॉलेज मध्ये सर्वांत आधी ज्ञानुशी मैत्री झाली होती व आजही ११ वी पासून १२ वी पर्यंत आमची मैत्री अजूनही तशीच टिकून आहे. १२ वी च्या सुरुवाती-पासून आम्ही एकाच बेंच वर एकत्र बसतो. पुस्तके, घटना, विचार ई., आम्ही एकत्र शेअर करतो.
तिचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव उत्कृष्ट आहे.ती सभोवतालच्या लोकांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. ज्ञानू सारखी मैत्रीण मिळाल्याने मी स्वतः ला भाग्यवान समजते.मैत्रीत प्रत्येकांची छोटी- छोटी भांडणे होतात तशीच आमच्यात ही छोट्या- छोट्या कारणांवरून वाद होतात पण नंतर आम्ही पुन्हा एकमेकांशी कसे बोलू लागतो हे आम्हांला कळतही नाही.
आम्हांला एकमेकांची इतकी सवय झाली आहे की, मी किंवा ती एक दिवस जरी कॉलेज ला नाही गेले तर घरी आल्यावर आम्ही कॉल करून विचारतो. आम्ही जरी जिवलग मैत्रिणी असलो तरी आमच्यात बहिणी- बहिणी सारखे नाते आहे. ती आत्ता आमच्या परिवारातील एक सदस्यच आहे. आम्ही एकमेकांना प्रत्येक कामात मदत करतो मग तो अभ्यास असेना किंवा एखादे उपक्रम. आम्ही दोघेही १२ वी नंतरही आमची मैत्री अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.
thanks for visiting the blog
Comments
Post a Comment