नवरात्री व्रताचे प्रकार मराठी

 नवरात्री व्रतात माँ आदिशक्तींची उपासना, पूजा केली जाते. मातेच्या नऊ रूपांचे ध्यान केले जाते. ते नऊ रूप पुढीलप्रमाणे: 
१) शैलपुत्री 
२) ब्रह्मचारिणी
३) चंद्रघंटा
४) कुष्मांडा
५) स्कंदमाता
६) कात्यायनी
७) कालरात्री
८) महागौरी
९) सिद्धिदात्री

    मातेच्या या नऊ रुपांचे भाविक पुजन- ध्यान व श्रद्धेने उपावस ही  करतात. नवरात्रीच्या उपवासात नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे  असते. ज्यांना नवरात्रीच्या व्रतात नऊ दिवस काही कारणास्तव उपवास करण्यास जमत नाही त्यांच्यासाठी हे पर्याय शास्त्रात नमूद केलेले आहे. ते पुढीलप्रमाणे:
    १) सप्तरात्र व्रत :-  हे व्रत प्रतिपदेपासून  सप्तमीपर्यंत केले जाते.
   २) पंचमी व्रत :- हे व्रत नवरात्रात फक्त पंचमीला केले जाते. या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता.
   ३) नक्तव्रत :- सहाव्या दिवशी रात्रीच्या जेवणासह उपवास आणी सप्तमीला व्रतकर्त्या व्यक्तीने काहीही न मागता जे काही मिळेल ते ग्रहण केले पाहिले.
   ४) त्रिरात्र व्रत :- ज्या व्यक्तींना सर्व उपवास करणे शक्य होत नाही, ते सप्तमी,अष्टमी व नवमीचे व्रत करू शकतात. 
  ५) एकात्र व्रत :- नवरात्रीचा प्रथम व अंतिम दिवस उपवास केला जातो.
  ६) युगमरात्र व्रत :- या व्रतात प्रतिपदा आणी अष्टमीचे व्रत करतात.

    नवरात्र व्रताचे नियम तुम्हांला माझ्या पुढील ब्लॉग मध्ये वाचायला मिळेल.
 
          thanks for visiting the blog 

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी