Posts

माता सती माहिती भाग ३

      माता सतींचे सर्व शक्तीपीठ स्थापित झाल्यानंतर भगवान विष्णु व ब्रह्मदेव माता आदिशक्तिसतीं कडे  जातात व त्यांना, "तुम्ही पुनर्जन्म घ्या व शिवांशी विवाह करून या सृष्टीचा उद्धार करा" असे म्हणतात. त्यावर माता आदिशक्ती सती  म्हणतात, मी पुढील जन्मात हिमालयाची कन्या म्हणजेच पर्वतराज हिमावन ची पुत्री म्हणून पुनर्जन्म घेईल. ठरल्याप्रमाणे माता आदिशक्ती सती राणी मैनावती च्या स्वप्नात दर्शन देतात व मी तुझी पुत्री म्हणून जन्म घेईल असे सांगतात.      काही दिवसांनी माता आदिसती राजा हिमावन च्या घरी त्यांची कन्या म्हणून जन्म घेतात. परंतु, दुसरीकडे भगवान शंकर अजूनही अमरनाथ गुहेत समाधीस्थ असतात. माता आदिसती पुनर्जन्मात पर्वतराज हिमावन ची पुत्री "पार्वती" म्हणून जन्म घेतात. माता पार्वतींच्या पितांचे नाव "हिमनरेश हिमावन" व मातेचे नाव "मैनावती" असते. माता सतींनी "पार्वती" म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर काही तासाने त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक "बहुरूपा" नावाची राक्षसीन येते. तारकासुर राक्षसाने तिला माता पार्वतींचे अपहरण करून त्यांचा वध करण्या...

माता सती माहिती भाग २

      माता सती माहिती भाग १ मध्ये आपण पाहिले की, भगवान शिव आपल्या पत्नींचे म्हणजेच माता सतींच्या पार्थिवासहित संपूर्ण सृष्टीत भ्रमण करत होते. त्यावेळी संपूर्ण सृष्टी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा ही घटना रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले शस्त्र सुदर्शन चक्राने माता सतींच्या देहाचे ५१ भागांमध्ये विभाजन केले व, हे माता सतींच्या शरीराचे अवयव व अलंकार पृथ्वीवर जेथे- जेथे विखुरले तेथे भगवान शिवांनी आपल्या जटांमधुन कालभैरव निर्माण केले. पृथ्वीवर जेथे माता सतींचे शक्तीपीठ आहे, तेथे भगवान कालभैरव त्या शक्तीपीठाच्या सुरक्षेसाठी विराजमान आहेत.           आता आपण माता सतींचे ५१ पवित्र शक्तीपीठ कुठे आहेत हे जाणून घेऊयात.      १) माता हिंगलाज मंदिर, पाकिस्तान     २) श्री माँ नयना देवी मंदिर, हिमाचल प्रदेश    ३) सुगंधा (सुनंदा) शक्तिपीठ, शिकारपुर बांग्लादेश    ४) महामाया शक्तीपीठ, कश्मीर     ५) माँ ज्वाला देवी मंदिर, हिमाचल प्रदेश    ६) माँ अम्बाजी मंदिर, गुजरात    ...

माता सती माहिती भाग १

      पौरानिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मादेवाला ब्रह्मांडाची निर्मिती करायची होती तेव्हा त्यांनी देवी आदिशक्ति आणि भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले. तेव्हा देवी आदिशाक्ति प्रकट झाल्या व भगवान शिवाशी विभक्त होऊन ब्रह्मदेवाला सृष्टीच्या निर्मितीसाठी मदत केली. सृष्टीच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने देवी आदिशाक्तिला पुन्हा भगवान शिवाकडे सोपावयाचे  ठरविले परंतु, भगवान शिव माता आदिशाक्तिला स्वीकारत नव्हते.       माता आदिशाक्तिला भगवान शिवाकडे सोपवण्याकरिता ब्रह्मदेव त्यांचा मानसपुत्र प्रजापती दक्षाला माता आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी तप करण्यास सांगतात व वरदान स्वरूप माता आदिशक्तींना त्यांच्याकडे पुत्री रूपात जन्म घेण्यास सांगतात. दक्ष कित्येक वर्षे कठोर तप करतो व आंतिमत: माता आदिशक्ती प्रजापती दक्ष च्या तपावर प्रसन्न होऊन तेथे प्रकट होतात व दक्ष ला वरदान मागण्यास सांगतात.      तेव्हा आपण स्वतः माझ्या घरी माझी पुत्री म्हणून जन्म घ्या व उचित वेळ आल्यावर मी तुमचे भगवान शिवाशी विवाह करून देईल असे म्हणतात. त्यावर मी तुझी पुत्री म्हणून जन...

होळी सण माहिती

  होळी सण माहिती मराठी     होळी हा भारतातील प्राचीन आणि मुख्य सण आहे. हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.हा सण 'रंगांचा सण' म्हणूनही ओळखला जातो.होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते.या‌ होलिका दहनाची एक पौराणिक कथा आहे.     प्राचीन काळी हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर होता.हिरण्यकश्यपुला भगवान विष्णुंचा द्वेष असे.परंतु, हिरण्यकश्यपुचा मुलगा भगवान विष्णुंचा परमभक्त होता. हे हिरण्यकश्यपुला आवडत नसे. हिरण्यकश्यपुने आपला मुलगा प्रल्हादाला ठार मारण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला.‌ शेवटी‌ हिरण्यकश्यपुने आपली लहान बहीण होलिका ला बोलावले. होलिकेला आगीतही भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. हिरण्यकश्यपुच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादाला ‌मांडीवर घेऊन‌‌ आगीत बसली. भगवान विष्णुंना ते आवडले नाही. आणि त्याच आगीत होलिका भस्म झाली. म्हणून आपण होलिका दहन करतो.      प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली‌ असते तिला होळीची माळ म्हणतात. तेथे एक खड्डा खणतात. त्यात झाड...

जागतिक महिला दिन

   माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐💐🙏🏻

शिव नामावली

    शिव नामावली १०८           ओम नम: शिवाय      ओम महाकालाय नम:     ओम कालकालाय नम:     ओम ज्योतिर्लिंगाय नम:        ओम तेजपुंजाय नम:       ओम आशुतोषाय नम: ‌‌‌   ओम आदिनाथाय नम:     ओम महाभूताय नम:     ओम भूतनाथाय नम:    ओम पंचवक्त्राय नम:      ओम त्रिनेत्राय नम:     ओम त्रिशूलधराय नम:    ओम तापत्रय हराय नम:     ओम गंगाधराय नम:      ओम भुजंगप्रियाय नम:    ओम जटाधराय नम:     ओम नंदीश्वराय नम:      ओम दंडीश्चराय नम:     ओम चंडीश्वराय नम:     ओम चंद्रशेखराय नम:     ओम हराय नम:    ओम अघोराय नम:      ओम घोर घोराय नम:    ओम अम्रूताय नम:     ओम तत्पुरूषाय नम:    ओम महादेवाय नम:     ओम सद्योजाताय नम:    ओम वामदेवाय नम:     ओम कलविक...

महाशिवरात्रि ची माहिती मराठी

   महाशिवरात्रि ची माहिती मराठी‌   महाशिवरात्रि हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. दरवर्षी महाशिवरात्रि हा सण माघी क्रूष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. असं‌ म्हणतात की, याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून या दिवसाला अध्यात्मिक आणि पौराणिक असे दोन्ही महत्व आहे. यंदा महाशिवरात्रि १ मार्च २०२२ रोजी येणार आहे.       महाशिवरात्रि ची पुराणकथा :      ज्यावेळी समुद्रमंथन झाले तेव्हा, अनेक प्रकारचे हिरे, नवरत्न, शंख, कामधेनु यांसारख्या अनेक गोष्टी मंथनातून बाहेर आल्या. परंतु त्याच वेळी समुद्रमंथनातून मोठ्या प्रमाणात विष बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची क्षमता होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून समस्त ब्रह्मांडाचे रक्षण केले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व त्यांना 'निलकंठ' नाम देण्यात आले.      पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे, स्वर्गलोकातील एक दिवस. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात, शिवाच्या या विश्रांत...