Posts

विजयादशमी/दसरा महत्व मराठी

      विजयादशमी म्हणजेच असत्यावर सत्याने मिळवलेला विजय होय. प्रत्येक वर्षी आश्विन माहतील दशमी तिथीला विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून हा सण साजरा केला जातो.     पौराणिक मान्यतानुसार, याच तिथीला भगवान श्रीरामांनी लंका नरेश आणी लंकापती रावणाचा युद्धात पराभव करून त्याचा अंत केला. याशिवाय विजयादशमीला 10 दिवसांपर्यंत सुरु असलेल्या  युद्धात  माँ दुर्गाने महिषासुर नावाच्या दैत्याचा संहार केला. यामुळे, यादिवशी अहंकाररुपी रावणाच्या पुतळ्याचा अग्नीदहन केला जातो. या दिवशी माँ आदिशक्तीच्या घटस्थापनेचे  उद्यापन केले जाते. यादिवशी शस्त्र पुजा, शमी पुजा, माँ दुर्गा आणी प्रभू श्रीरामांची पुजा करण्यास विशेष महत्व असते. असा हा दसरा सण.           Thanks for visiting the blog

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

      अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो.    १)या दिवशी सत्ययुगाचा आणी त्रेतायुगाचा आरंभ झाला होता.    २)श्रीविष्णूंचे अवतार असलेले श्री.परशुराम या दिवशी पृथीवर अवतरीत झाले.    ३)या दिवशी श्री.वेदव्यासांनी महाभारत लेखनास आरंभ केला.    ४)या दिवशी गंगा माता स्वर्गातून पृथीवर अवतरीत झाले असेही म्हटले जाते.         ५)अक्षयतृतीयेलाच माता अन्नपूर्णेचा जन्म झाला.        अक्षयतृतिया शुभ कार्यासाठी उत्तम तिथी मानली जाते. या दिवशी केलेले जप, तप, दान क्षयाला जात नाही.

नवरात्रीचे नैवेद्य मराठी

      नवरात्रीच्या प्रथम दिवशी माता आदिशक्तींच्या प्रथम रूपाचे म्हणजेच माता शैलपुत्रीचे करतात व मातेला गायचे शुद्ध तुप अर्पण केले जाते.       दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते व मातेला साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो.       तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते व मातेला दूध अथवा दुधापासून तयार केलेले पदार्थ  चा नैवेद्य दाखविला जातो.        चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते व मातेला मालपोह्याचा नैवेद्य दाखविला जातो.       पाचव्या दिवशी माता स्कंदमातेचे पूजन केले जातो व मातेला कळ्याचा नैवेद्य दाखविला जातो.        सहाव्या दिवशी माता कात्यायनी ची पूजा केली जाते व मातेला मधाचा नैवेद्य दाखविला जातो.        सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते व मातेला गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.       आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते व मातेला नारळाचा नैवेद्य दाखविला जातो.       नवव्या दिवशी माता सिद्धिदा...

नवरात्रीचे नऊ रंग मराठी

    नवरात्रात परिधान केले जाणारे नऊ रंग पुढीलप्रमाणे :-       १) पांढरा      २) लाल     ३) निळा      ४) पिवळा     ५) हिरवा     ६) राखाडी     ७) केशरी      ८) मोरपंखी     ९) गुलाबी      वर दिलेले नऊ रंगाचे वस्त्र नवरात्रीत परिधान करणे शुभ मानले जाते.

नवरात्री व्रताचे प्रकार मराठी

  नवरात्री व्रतात माँ आदिशक्तींची उपासना, पूजा केली जाते. मातेच्या नऊ रूपांचे ध्यान केले जाते. ते नऊ रूप पुढीलप्रमाणे:  १) शैलपुत्री  २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कुष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदात्री     मातेच्या या नऊ रुपांचे भाविक पुजन- ध्यान व श्रद्धेने उपावस ही  करतात. नवरात्रीच्या उपवासात नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे  असते. ज्यांना नवरात्रीच्या व्रतात नऊ दिवस काही कारणास्तव उपवास करण्यास जमत नाही त्यांच्यासाठी हे पर्याय शास्त्रात नमूद केलेले आहे. ते पुढीलप्रमाणे:     १) सप्तरात्र व्रत :-  हे व्रत प्रतिपदेपासून  सप्तमीपर्यंत केले जाते.    २) पंचमी व्रत :- हे व्रत नवरात्रात फक्त पंचमीला केले जाते. या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता.    ३) नक्तव्रत :- सहाव्या दिवशी रात्रीच्या जेवणासह उपवास आणी सप्तमीला व्रतकर्त्या व्यक्तीने काहीही न मागता जे काही मिळेल ते ग्रहण केले पाहिले.    ४) त्रिरात्र व्रत :- ज्या व्यक्तींना सर्व उपवास करणे शक्य होत नाही...

श्री गणेश आरती मराठी

      सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।      नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।      सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।       कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।     जय देव, जय देव जय मंगलमूर्ती ।     दर्शनमात्रे मात्रे मन कामना पुरती ।। ध्रू‌ ।।     रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।     चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।      हरेजडीत मुकुट शोभतो बरा ।      रूनझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।२।।            ।। जय देव जय देव० ।।      लंबोदर पितांबर फणिवर बंधना ।      ‌‌सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।      दास रामाचा वाट पाहे सदना ।     संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे,‌ सुरवरवंदना ।।३।। ‌            ।। जय देव जय देव० ।।                           

गणेश चतुर्थी व्रत कथा मराठी

    एकदा महादेव आणी पार्वती माता नर्मदा नदीच्या काठी गेले. तेथे पार्वतींनी महादेवांसोबत एका सुंदर ठिकाणी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा महादेव म्हणाले की, आपल्या पराभवाचा आणी विजयाचा साक्षीदार कोण असेल? तेव्हा पार्वती मातेने तिथल्या गवतातून पेंढया गोळा केल्या आणी एका बालकाचा पुतळा बनविला आणी त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून त्यांना म्हणाल्या, बाळा! आम्ही चौपद खेळतो. खेळाच्या शेवटी कोण जिंकेल, कोण हरेल हे तु ठरवायचं.    खेळाला सुरुवात झाली. महादेव आणी माँ पार्वती चौपद खेळू लागले. योगा- योगाने पार्वती मातांनी तिन्ही वेळा खेळात विजय मिळवीला. शेवटी जेव्हा त्या बालकाला जय- पराजयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने महादेवांना विजयी घोषित केले. यामुळे माता पार्वती रागावल्या आणी पार्वती मातांनी क्रोधित होऊन त्या बालकाला एका पायाने लंगडा होऊन तेथेच चिखलात पडून दुःख भोगण्याचा श्राप होता. बालकाने नम्रपणे सांगितले, आई, माझ्या अज्ञानामुळे हे घडले आहे. मी हे काही रागाने अथवा कुटीलपणाने केले नाही.तुम्ही मला माफ करा.      तेव्हा पार्वती मातांनी त्याला सांगितले ...