Posts

कीर्तन: प्रबोधन की मनोरंजन?

    नमस्कार मित्रांनो मी आर्या भोसुरे. आज आपण कीर्तन प्रबोधन की मनोरंजन हे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम कीर्तन म्हणजे काय हे जाणून घेणे मला महत्वाचे वाटते म्हणून, आज हा विषय आपण तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत. प्रथम कीर्तनाची व्याख्या, द्वितीय कीर्तनाची माहिती, आणी शेवट कीर्तन: प्रबोधन की मनोरंजनासाठी असते?     मित्रांनो कीर्तन मधील किर म्हणजे काढणे, उपटून टाकणे आणी तण म्हणजे गवत. आपल्याला गवत काढायचेच आहे परंतु ते शेतातले नाही बरं का तर श्रोत्यांच्या मनाभोवती असलेले अज्ञानरूपी, अंधःकाररूपी निर्माण झालेले तण उपटून टाकणे म्हणजेच कीर्तन होय, आणी हे कार्य करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात.      ही झाली कीर्तनाची व्याख्या आता आपण कीर्तनाची माहिती बघणार आहोत. देवश्री नारदांना भारतातील आद्य कीर्तनकार म्हटले जाते.देवश्री नारदांनी कीर्तन हे महर्षी व्यासांना शिकवले पुढे जाऊन व्यास महर्षीनीं ते शुकास शिकवले व पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणी सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो.श्रीमद...

माझा छंद निबंध मराठी

    छंद म्हणजेच आवड. आपण जेव्हा एखादी कला जोपासतो तेव्हा त्याला छंद जोपासने असे म्हटले जाते. कला या अनेक प्रकारच्या असतात.जसे बाप्पांना ६४ कला प्राप्त आहेत तसे प्रत्येकाला विविध प्रकारच्या कला प्राप्त असतात.     माझी छंद चित्र काढणे हा आहे. चित्र काढण्याबरोबरच मला भाषण, ब्लॉगिंग, गायन, मेहंदी काढणे यांची देखील आवड आहे. चित्र काढताना माझे मन गुंग होऊन जाते. ते चित्र काढताना मला वेळेचेही भान राहत नाही. अनेक वेळा सकाळी चित्र काढायला सुरुवात केली तर संध्याकाळ कशी होऊन जाते हे देखील मला उमगत नाही. मी आजवर अनेक चित्रे काढली आहेत, त्यातीलच काही चित्रे मी शिकत असलेल्या high-school च्या वर्गात आजही भिंतींवर लावलेली आहेत.      सुरुवातीला मला चित्र काढायला फारसे जमत नव्हते, परंतु काही काळाने मला चित्र काढायला जमायला लागले. तेव्हापासून ते आजवर मी माझा छंद जोपासत आहे, आणी यापुढेही हा छंद जोपासण्याचा प्रयत्न करेन. मी माझी अनेक चित्रे drawing- book मध्ये जतन केलेली आहेत. उदा,.. बाप्पा, आई- मुलीचे चित्र, बहीण- भावामधील प्रेमाचे प्रतिक असलेले चित्र, इत्यादी,..  ...

विजयादशमी/दसरा महत्व मराठी

      विजयादशमी म्हणजेच असत्यावर सत्याने मिळवलेला विजय होय. प्रत्येक वर्षी आश्विन माहतील दशमी तिथीला विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून हा सण साजरा केला जातो.     पौराणिक मान्यतानुसार, याच तिथीला भगवान श्रीरामांनी लंका नरेश आणी लंकापती रावणाचा युद्धात पराभव करून त्याचा अंत केला. याशिवाय विजयादशमीला 10 दिवसांपर्यंत सुरु असलेल्या  युद्धात  माँ दुर्गाने महिषासुर नावाच्या दैत्याचा संहार केला. यामुळे, यादिवशी अहंकाररुपी रावणाच्या पुतळ्याचा अग्नीदहन केला जातो. या दिवशी माँ आदिशक्तीच्या घटस्थापनेचे  उद्यापन केले जाते. यादिवशी शस्त्र पुजा, शमी पुजा, माँ दुर्गा आणी प्रभू श्रीरामांची पुजा करण्यास विशेष महत्व असते. असा हा दसरा सण.           Thanks for visiting the blog

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

      अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो.    १)या दिवशी सत्ययुगाचा आणी त्रेतायुगाचा आरंभ झाला होता.    २)श्रीविष्णूंचे अवतार असलेले श्री.परशुराम या दिवशी पृथीवर अवतरीत झाले.    ३)या दिवशी श्री.वेदव्यासांनी महाभारत लेखनास आरंभ केला.    ४)या दिवशी गंगा माता स्वर्गातून पृथीवर अवतरीत झाले असेही म्हटले जाते.         ५)अक्षयतृतीयेलाच माता अन्नपूर्णेचा जन्म झाला.        अक्षयतृतिया शुभ कार्यासाठी उत्तम तिथी मानली जाते. या दिवशी केलेले जप, तप, दान क्षयाला जात नाही.

नवरात्रीचे नैवेद्य मराठी

      नवरात्रीच्या प्रथम दिवशी माता आदिशक्तींच्या प्रथम रूपाचे म्हणजेच माता शैलपुत्रीचे करतात व मातेला गायचे शुद्ध तुप अर्पण केले जाते.       दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते व मातेला साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो.       तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते व मातेला दूध अथवा दुधापासून तयार केलेले पदार्थ  चा नैवेद्य दाखविला जातो.        चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते व मातेला मालपोह्याचा नैवेद्य दाखविला जातो.       पाचव्या दिवशी माता स्कंदमातेचे पूजन केले जातो व मातेला कळ्याचा नैवेद्य दाखविला जातो.        सहाव्या दिवशी माता कात्यायनी ची पूजा केली जाते व मातेला मधाचा नैवेद्य दाखविला जातो.        सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते व मातेला गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.       आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते व मातेला नारळाचा नैवेद्य दाखविला जातो.       नवव्या दिवशी माता सिद्धिदा...

नवरात्रीचे नऊ रंग मराठी

    नवरात्रात परिधान केले जाणारे नऊ रंग पुढीलप्रमाणे :-       १) पांढरा      २) लाल     ३) निळा      ४) पिवळा     ५) हिरवा     ६) राखाडी     ७) केशरी      ८) मोरपंखी     ९) गुलाबी      वर दिलेले नऊ रंगाचे वस्त्र नवरात्रीत परिधान करणे शुभ मानले जाते.

नवरात्री व्रताचे प्रकार मराठी

  नवरात्री व्रतात माँ आदिशक्तींची उपासना, पूजा केली जाते. मातेच्या नऊ रूपांचे ध्यान केले जाते. ते नऊ रूप पुढीलप्रमाणे:  १) शैलपुत्री  २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कुष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदात्री     मातेच्या या नऊ रुपांचे भाविक पुजन- ध्यान व श्रद्धेने उपावस ही  करतात. नवरात्रीच्या उपवासात नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे  असते. ज्यांना नवरात्रीच्या व्रतात नऊ दिवस काही कारणास्तव उपवास करण्यास जमत नाही त्यांच्यासाठी हे पर्याय शास्त्रात नमूद केलेले आहे. ते पुढीलप्रमाणे:     १) सप्तरात्र व्रत :-  हे व्रत प्रतिपदेपासून  सप्तमीपर्यंत केले जाते.    २) पंचमी व्रत :- हे व्रत नवरात्रात फक्त पंचमीला केले जाते. या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता.    ३) नक्तव्रत :- सहाव्या दिवशी रात्रीच्या जेवणासह उपवास आणी सप्तमीला व्रतकर्त्या व्यक्तीने काहीही न मागता जे काही मिळेल ते ग्रहण केले पाहिले.    ४) त्रिरात्र व्रत :- ज्या व्यक्तींना सर्व उपवास करणे शक्य होत नाही...