Posts

नवरात्री व्रताचे प्रकार मराठी

  नवरात्री व्रतात माँ आदिशक्तींची उपासना, पूजा केली जाते. मातेच्या नऊ रूपांचे ध्यान केले जाते. ते नऊ रूप पुढीलप्रमाणे:  १) शैलपुत्री  २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कुष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदात्री     मातेच्या या नऊ रुपांचे भाविक पुजन- ध्यान व श्रद्धेने उपावस ही  करतात. नवरात्रीच्या उपवासात नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे  असते. ज्यांना नवरात्रीच्या व्रतात नऊ दिवस काही कारणास्तव उपवास करण्यास जमत नाही त्यांच्यासाठी हे पर्याय शास्त्रात नमूद केलेले आहे. ते पुढीलप्रमाणे:     १) सप्तरात्र व्रत :-  हे व्रत प्रतिपदेपासून  सप्तमीपर्यंत केले जाते.    २) पंचमी व्रत :- हे व्रत नवरात्रात फक्त पंचमीला केले जाते. या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता.    ३) नक्तव्रत :- सहाव्या दिवशी रात्रीच्या जेवणासह उपवास आणी सप्तमीला व्रतकर्त्या व्यक्तीने काहीही न मागता जे काही मिळेल ते ग्रहण केले पाहिले.    ४) त्रिरात्र व्रत :- ज्या व्यक्तींना सर्व उपवास करणे शक्य होत नाही...

श्री गणेश आरती मराठी

      सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।      नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।      सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।       कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।     जय देव, जय देव जय मंगलमूर्ती ।     दर्शनमात्रे मात्रे मन कामना पुरती ।। ध्रू‌ ।।     रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।     चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।      हरेजडीत मुकुट शोभतो बरा ।      रूनझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।२।।            ।। जय देव जय देव० ।।      लंबोदर पितांबर फणिवर बंधना ।      ‌‌सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।      दास रामाचा वाट पाहे सदना ।     संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे,‌ सुरवरवंदना ।।३।। ‌            ।। जय देव जय देव० ।।                           

गणेश चतुर्थी व्रत कथा मराठी

    एकदा महादेव आणी पार्वती माता नर्मदा नदीच्या काठी गेले. तेथे पार्वतींनी महादेवांसोबत एका सुंदर ठिकाणी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा महादेव म्हणाले की, आपल्या पराभवाचा आणी विजयाचा साक्षीदार कोण असेल? तेव्हा पार्वती मातेने तिथल्या गवतातून पेंढया गोळा केल्या आणी एका बालकाचा पुतळा बनविला आणी त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून त्यांना म्हणाल्या, बाळा! आम्ही चौपद खेळतो. खेळाच्या शेवटी कोण जिंकेल, कोण हरेल हे तु ठरवायचं.    खेळाला सुरुवात झाली. महादेव आणी माँ पार्वती चौपद खेळू लागले. योगा- योगाने पार्वती मातांनी तिन्ही वेळा खेळात विजय मिळवीला. शेवटी जेव्हा त्या बालकाला जय- पराजयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने महादेवांना विजयी घोषित केले. यामुळे माता पार्वती रागावल्या आणी पार्वती मातांनी क्रोधित होऊन त्या बालकाला एका पायाने लंगडा होऊन तेथेच चिखलात पडून दुःख भोगण्याचा श्राप होता. बालकाने नम्रपणे सांगितले, आई, माझ्या अज्ञानामुळे हे घडले आहे. मी हे काही रागाने अथवा कुटीलपणाने केले नाही.तुम्ही मला माफ करा.      तेव्हा पार्वती मातांनी त्याला सांगितले ...

कथा हरितालिकेची मराठी

     एके दिवशी शंकर पार्वती कैलासपर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकरांना विचारलं की, स्वामी सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? आणी कोणत्या पुण्याईनं मी आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.     तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, नंद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तु पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणी त्याच पुण्यानं तु मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तु कसं केलंस ते मी तुला आता सांगतो.      तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ठ वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी चिंता त्यांना पडली.     इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारदमुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे त...

माझी जिवलग मैत्रीण मनोगत

        आजच्या दिनी मी माझ्या जिवलग मैत्री ण  वर  मनोगत मांडतेय. माझ्या कॉलेज मध्ये अनेक मैत्रिणी आहेत परंतु त्या सर्वांमध्ये माझी जिवलग मैत्रीण ज्ञानेश्वरी आहे. आम्ही एकमेकांना ज्ञानू व आरु नावानेच बोलतो. असं म्हणतात की जी नाती रक्ताची नसूनही आपली त्यांच्याशी नकळत ओळख होऊन एक अतूट नाते निर्माण होते तिला मैत्री असे म्हणतात.          कोणीही आपले नात्यातले नसताना अचानक आपले होते ती असते मैत्री.     आई- बाबां पेक्षाही जिच्यासोबत एखादी घटना सांगावीशी वाटते ती असते मैत्री.      परिवारा- पेक्षाही आपल्याला  जास्त ओळखते ती असते मैत्री.      मैत्री हसणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, ती भांडनारी का असेना पण नेहमी साथ देणारी असावी.           मैत्रीची व्याख्या वेगवेगळी असते.मैत्री करायची असेल ना तर पाण्यासारखी निर्मळ अशी, दूर जाऊनही क्षणो- क्षणी आठवण येईल अशी मैत्री करावी. खरी मैत्री तिच असते जी वाईट काळात सुद्धा साथ देईल. मी कोणत्याही अडचणीत असले की ती मला नेहमी साथ द...

सोम प्रदोष व्रत कथा मराठी

∆ कथा सोम प्रदोष व्रताची :-                       पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी राहत होती. तिच्या पतींचं निधन झालं होत. तिला पोटा- पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी बाहेर जावं लागायचं. ती स्वतः आपल्या मुलाला भिक मागून खाऊ घालायची.एक दिवस ब्राह्मणी घरी परतत असतांना तिला एक मुलगा जखमी अवस्थेत व्हिवळत‌ असल्याचे आढळले. ब्राह्मणीने त्याला तिच्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला केलता आणी त्याच्या वडिलांना पकडून आणले होते आणी राज्याचा ताबा घेतला होता, म्हणून तो इकडे- तिकडे फिरत होता.      राजकुमार ब्राह्मणांच्या घरात त्यांच्या पुत्राबरोबर राहू लागला आणी एक दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले आणी ती त्यावर मोहित झाली.दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई- वडिलांना राजकुमाराला भेटण्यासाठी घेऊन आली. त्यांना देखील राजकुमार आवडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरानीं अंशुमतीच्या आई- वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की, राजकुमार आणी अंशुमतीचे लग्न लावून द्या....

श्रावण सोमवार व्रत कथा मराठी

∆ कथा श्रावणी सोमवार ची :-           एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे धन- दौलत, मान- सन्मान सर्व काही होते परंतु त्याला संतान नसल्याने तो नेहमी दुःखी राहायचा.     त्याला नेहमी चिंता वाटायची की, आपला व्यापार, संपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार? म्हणून त्याने पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांचे व्रत आणी पूजा करत असे. तसेच सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवजीं समोर तुपाचा दिवा लावत असे.     त्या व्यापाऱ्याची भक्ती पाहून माँ पार्वती भगवान शिवांना म्हणतात की, 'स्वामी हा व्यापारी तुमचा भक्त आहे. अनेक वर्ष याने सोमवार व्रत व पूजा नियमितपणे केली आहे. तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करायला हवी.'     तेव्हा भगवान शिव माँ पार्वतींकडे बघून मंद हास्य करत उत्तर देतात की, 'हे पार्वती, या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते.' पण माँ पार्वतींनी हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे. माँ पार्वतींच्या आग्रहावरून भगवान शिव त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्त...