माझी जिवलग मैत्रीण मनोगत
आजच्या दिनी मी माझ्या जिवलग मैत्री ण वर मनोगत मांडतेय. माझ्या कॉलेज मध्ये अनेक मैत्रिणी आहेत परंतु त्या सर्वांमध्ये माझी जिवलग मैत्रीण ज्ञानेश्वरी आहे. आम्ही एकमेकांना ज्ञानू व आरु नावानेच बोलतो. असं म्हणतात की जी नाती रक्ताची नसूनही आपली त्यांच्याशी नकळत ओळख होऊन एक अतूट नाते निर्माण होते तिला मैत्री असे म्हणतात. कोणीही आपले नात्यातले नसताना अचानक आपले होते ती असते मैत्री. आई- बाबां पेक्षाही जिच्यासोबत एखादी घटना सांगावीशी वाटते ती असते मैत्री. परिवारा- पेक्षाही आपल्याला जास्त ओळखते ती असते मैत्री. मैत्री हसणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, ती भांडनारी का असेना पण नेहमी साथ देणारी असावी. मैत्रीची व्याख्या वेगवेगळी असते.मैत्री करायची असेल ना तर पाण्यासारखी निर्मळ अशी, दूर जाऊनही क्षणो- क्षणी आठवण येईल अशी मैत्री करावी. खरी मैत्री तिच असते जी वाईट काळात सुद्धा साथ देईल. मी कोणत्याही अडचणीत असले की ती मला नेहमी साथ द...