Posts

Showing posts from May, 2022

श्री हनुमान जयंती मागील पौराणिक कथा

      श्री हनुमंतांना महादेवांचे ११ वे रुद्रावतार म्हटले जाते.श्री हनुमान हे प्रभू रामांचे परमभक्त आहेत. हनुमानांचा जन्म वानरकुळात झाला. हनुमानांचा जन्म राजा केसरी व अंजना मातेच्या पोटी झाला. अंजना मातेंना विवाहपश्चात कित्येक वर्ष झाले परंतु, त्यानां एकही पुत्र नसल्याने त्या दुःखी होत्या. म्हणून त्या शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या करतात. अंजना मातेची घोर तपस्या पाहून महादेव प्रसन्न होतात व त्यांना वरदान मागण्यास सांगतात. यावर माता अंजना 'तुम्ही माझ्या पुत्ररूपात जन्म घ्या' असे वरदान मागतात. त्यावर महादेव तथास्तु म्हणतात.     सुमेरू येथे केसरी राजाचे राज्य होते. कलियुगात संकटांचे हरण करणारा एकमेव हनुमान जागृत देवता असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच बोलतात, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान  एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान.  हनुमंतांना मारुती, पवनपुत्र, पवनसूत, बजरंबली, आंजनेय, केसरीनंदन, अशा अनेक नावाने ओळखले जाते. हनुमानांचे शस्त्र 'गदा' आहे. हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुलं‌ पानं अर्पण केले जाते.     रामायण युद्धादरम्यान मेघनाथ ने ल...

श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा

      भगवान विष्णूंनी द्वापारयुगात दृष्टांच्या संहारासाठी पृथ्वीलोकावर 'कृष्ण' नावाने अवतार घेतला. अवतार म्हणजे, पुनर्जन्म घेतला. श्रीकृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतरंगातील आनंदमय असे तत्त्व आहेत. श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री १२ वाजेच्या आसपास रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला.     कृष्णाचा मामा कंस याने, देवकीच पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून स्वतःची सख्खी बहीण देवकीला व देवकी मातेचे पती वासुदेव यांना कैदेत ठेवलं होत. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. देवकीच्या प्रत्येक नवजात बालकाला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. अशा प्रकारे कंसाने देवकी आणि वासुदेवाची सात अपत्ये ठार केली होती.     देवकीच्या पोटी आठव्या अपत्याचा जन्म झाला, ते आठवे अपत्य श्रीकृष्ण होते. श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यावेळी तुरुंगाचे रक्षक झोपी गेले होते या संधीचा फायदा घेऊन वासुदेवांनी आपले आठवे अपत्य मारले जाऊ नये, म्हणून श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांना गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे सुपूर्त केलं होतं. श...

श्री दत्त जयंती पौराणिक कथा

      प्रभु दत्तात्रयांच्या जन्माविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. 'अवधूत' हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे, नेहमी आनंदात रमणारा.   मात्र सर्व कथांमधून प्रभु दत्त हे अत्रीऋषी व अनुसया मातेंचे पुत्र आहेत हे समजते. प्रभु दत्त हे त्रिदेवांचे अवतार म्हणजेच ब्रह्मा, विष्णु व महेश (शिव) या तीनही देवांचे अवतार आहेत. योगसाधनेत प्रभु दत्तात्रेयांना 'गुरु' मानले जाते. प्रभु दत्तात्रेयांनी २४ गुरु केले. प्रभु दत्तात्रेयांच्या पाठीमागे असलेली गाय  म्हणजे पृथ्वी व प्रभुंच्या आसपास असलेले चार श्वान म्हणजे, चार वेदांचे प्रतीक आहे.     प्रभु दत्तांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे, श्रीदत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमावतात. घरोघरी फिरून भिक्षा मागितल्याने, 'अहं' कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. श्रीदत्तांच्या हातात आपणांस 'कमंडलू' दिसते. कमंडलू हे संन्याशाच्या सोबत आढळते. संन्यासी हा विरक्त असतो अशात कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक दर्शवते. श्रीदत्तांकडे ब्रह्मदेवांचे कमंडलू व जपमाळ, श्रीविष्णूंचे सुदर्शन चक्र व ...

त्रिपुरारी पौर्णिमा महत्वकथा

    त्रिपुरारी पौर्णिमा हा परमात्म्याच्या प्रत्येक स्वरुपाशी विश्वाला ओळख करून देणारा एकमेव अद्वितीय शुभ दिवस मानला जातो. १) परमात्म्याने शिव रूपात त्रिपुरासुराचा वध केला तो हाच दिवस. २) हिमालयकन्या माँ पार्वतींच्या कठोर तपश्चर्येला भुलून त्यांच्या समोर शिवशंकर उभे राहिले तो हाच दिवस. ३) श्री.गणेशांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली ती ह्याच दिवशी. ४) भगवान कार्तिकेयांचे देवांचा सेनापती म्हणून निवड केली ती ह्या दिवशी. ५) देवगुरू बृहस्पतींनी प्रभु दत्तात्रेयांच्या श्रीपादश्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती या अवताराची घोषणा केली तो हा दिवस. ६) भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र आटविला तो ह्याच दिवशी. ७) मारुतींनी श्रीराम व सीता मातेचे आपल्या हृदयातील अस्तित्व छाती फाडून समस्त विश्वासाठी खुले केले तो हाच दिवस.  ८) श्री विठ्ठल हे त्यांचा भक्त पुंडलिकाच्या घरी येऊन विठेवर उभे राहिले व पुंडलिकाच्या आग्रहावरून त्या विठेवर मूर्तिरूपात स्थापन झाले ते ह्याच दिवशी. अशी ही दिव्य त्रिपुरारी पौर्णिमा.              Thanks for visiting the blog

भाऊबीजे मागील पौराणिक कथा मराठी

    सूर्यादेवांची पत्नी छाया यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमराज आणि यमुना दोघेही सख्खे बहीण- भाऊ आहेत. यमुना देवी ने एकदा यमराजांना घरी जेवण्यासाठी बोलावले असता, यमराज व्यस्त असल्यामुळे ते बहिणीकडे जाऊ शकले नाहीत.     एकदा कार्तिक द्वितीयेला आपला भाऊ यमराज अचानक आपल्या दारात आलेला पाहून यमुना खूप आनंदित झाली. तीने यमराजांचे प्रेमाने स्वागत केले आणि भोजन वाढले. बहिणीचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून यमराज खुश होतात व बहीण यमुना ला वरदान मांगण्यास सांगतात. तेव्हा यमुना म्हणतात की, आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल व तिच्याकडून राखी बांधून घेईल व जी बहीण आपल्या भावाला मनोभावे प्रेमाने जेऊ घालेल त्यांना तुम्ही दीर्घायुष्य, सुख- समृद्धी प्रदान कराल.     यावर यमराज तथास्तु म्हणत यमपुरीला निघाले. या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिचे आदरातिथ्य स्वीकारतो त्याचे आयुष्य वाढते. त्याला व त्याच्या बहिणीला यमाचे भय राहत नाही. अशी ही भाऊबीजे मागील पौराणिक कथा.              Thanks for visiting the blog

श्री गणेश जन्मकथा मराठी

    बुद्धीचे देवता,  सुखकर्ता, १४ विद्या आणी ६४ कला प्राप्त असलेल्या श्री.गणेशांचा जन्म मान्यतेनुसार, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. आज मी तुम्हा सर्वांना गणेश जन्मामागील एक कथा सांगणार आहे.     कामदेवांचे रूपांतर भस्मात झाल्यांनंतर त्यांच्या अर्धांगिनी   देवी रतींनी माँ पार्वतींना श्राप दिला होता की, तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. तुम्ही  पुत्र प्रेमापासून वंचित राहाल. परंतु ब्रह्मदेव व विष्णू देवांच्या विंनतीवरून देवी रतींनी मातेला एक उपश्राप दिला की, तुम्ही आई बनाल परंतु,   कोणताही शिशु तुमच्या उदरात जन्म घेऊ शकणार नाही. त्यावर माँ पार्वतींनी त्यांचा श्राप स्वीकारला.      माँ पार्वतींचे भगवान शंकरांशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांना पुत्राची कमतरता भासू लागते. स्कंदपुराणाच्या ब्रह्मखंडातील कथेनुसार, माँ पार्वतींनी स्वतःच्या मळापासून एका सुंदर बालकाचा पुतळा बनविला. काही वेळाने त्या पुतळ्यात प्राण आले व त्या पुतळ्याचे रूपांतर एका आकर्षक व सुंदर पुत्रामध्ये झाले.    माँ पार्वतींनी त्या पुत्राला, 'तु माझा पुत्र आहेस'...

श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती। वानरी अंजनीसूता, रामदुता प्रभंजना ।।१।।  महाबली प्राणदाता, सकळां उठवी बळें। सौख्यकारी दु:खहारी धूर्त वैष्णव गायका ।।२।। दीनानाथा हरिरुपा, सुंदरा जगदंतरा। पातालदेवताहंता, भव्यसिंदूर लेपना ।।३।। लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना। पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।।४।। ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें। कालाग्नि, देखतां कांपती भयें ।।५।। ब्रह्मांडें माइलीं नेणों, आंवलें दंतपंगती। नेत्राग्नी चालिल्या ज्वाला, भ्रूकुटी ताठिल्या बळे।।६।। पुच्छ तें मुरडीलें माथां किरीटी कुडलें बरीं‌। सुवर्णकटिकांसोटी, घंटा किंकिमिनागरा ।।७। ठकारे पर्वतऐसा, नेटका सडपातलू। चपळांग पाहतां मोठें, महाविद्दुल्लतेपरी ।।८।। कोटीच्या कोटी उडाणें, झेपावें उत्तरेकडे। मंद्राद्रीसैरिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।। आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती। मानसी टाकिलें मागें गतीसी तुळणा नसे ।।१०।। अणूपासोनि ब्रह्मांडा एवडा होत जातसे। तायसी तुळणा कोठे मेरूमंदार धाकुटे ।।११।। ब्रह्मांडाभोवतें वेढे, वज्रपुच्छें करूं शके। तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहतां नसे ।।१२।। आरक्त द...

केशरी गुरुवार व्रत मराठी

      नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला प्रभू दत्तांचे व्रत या विषयी माहिती सांगणार आहे. गुरुवार हा प्रभू दत्तांचा वार आहे. श्री.दत्त हे आद्यगुरु आहेत. गुरुवार च्या दिवशी पिवळ्या रंगाला महत्त्व असते. गुरुवारी अनेक भाविक मोठ्या संख्येने प्रभू दत्तांची उपासना करतात. तसेच गुरुवारी केळ्याच्या झाडाचे पूजन करण्याला महत्त्व आहे. गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करणे शुभ असते. तसेच गुरुवार चे व्रत केले असल्यास पिवळेच अन्न खायचे असते.     शिवशंकरांच्या भक्तांसाठी सोमवार चे व्रत, गणेश भक्तांसाठी मंगळवार व बुधवार चे व्रत तसेच प्रभू दत्तांच्या भक्तांसाठी श्री. सत्य दत्त व्रत अर्थात केशरी गुरुवार चे व्रत केले जातात. पूजेसाठी खालील प्रमाणे साहित्य आणावे.     हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, तांदूळ, विड्याची पाने, साखर, फळे, उदबत्ती, कापूर, निरंजन, समई, चौरंग, चौरंगावर ठेवण्यासाठी पिवळे वस्त्र, पिवळे फुले, प्रसाद, तांब्या, कलश, ताम्हण, पळी, एखादे भांडे, पंचामृत, अत्तर, तसेच दक्षिणा.     वरील सर्व साहित्याने प्रभु दत्तांची विधीनुसार पुजा- आरती करून घ्यावी. पूजेच...

श्रावण सोमवार व्रत मराठी

      श्रावण मासात येणाऱ्या प्रत्येक सोमवार ला 'श्रावणी सोमवार' म्हटले जाते. भारतात हिंदू धर्मात  अनेक शिवभक्त मोठया संख्येने श्रावणी सोमवार चे उपवास, व्रत करतात व महादेवांना प्रसन्न करतात, त्यांची पूजा करतात. श्रावण मास भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. भगवान शंकरांचे श्रावण सोमवार चे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. हे व्रत करणाऱ्या भक्तांवर महादेव शीघ्र प्रसन्न होतात.     या व्रतामध्ये भगवान शिवशंकरांचे पूजन करून एका वेळचे भोजन ग्रहण केले जाते.सोबतच भगवान शंकर आणि माँ पार्वतींचे स्मरण करत पुजा केली पाहिजे. या व्रताने भगवान शिव प्रसन्न होऊन मनोवांछित वरदान देतात. श्रावण मासातील प्रत्येक सोमवार ला श्री. गणेशांचे, शिव जी व पार्वती मातेची पुजा करण्याचे विधान आहे.     सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान आदी निवृत्त झाल्यावर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सर्वप्रथम आपण श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा कारण, कोणत्याही व्रताचा संकल्प हा त्या व्रताचा महत्त्वपूर्ण भाग असतो. संकल्प हा केवळ पहिल्याच श्रावणी सोमवार ला करावा. दर सोमवारी संकल्प करू नये....

वटपौर्णिमा पुजा विधी मराठी

    ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. या दिवशी वडाच्या वृक्षाचे पुजन केले जाते म्हणून याला 'वटपौर्णिमा' असे म्हटले जाते.याच दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण यमदेवाकडून परत आणले होते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व जन्मोजन्मी मला हाच वर मिळावा म्हणून, वटवृक्षाची मनोभावे पुजा करतात तसेच उपवासही करतात.     स्त्रिया पुजेचे ताट घेऊन वटवृक्षाजवळ जातात. त्या ताटामध्ये दोरा, बांगड्या, कापूर, अत्तर, गुळ- खोबऱ्याचा नैवेद्य, विड्याची पाने, सुपारी, फळे, तुपाचा दिवा, दुर्वा, तांदूळ किंवा गहू, अगरबत्ती, एका भांड्यामध्ये  पाणी, हे सर्व सामान घेऊन जातात व वडाच्या झाडाचे मनोभावे पुजा करतात.     सर्वात आधी वडाच्या झाडाला पाणी घालतात. नंतर तेथे दिवा ठेऊन अगरबत्ती ओवाळून धुप- दीप व नैवेद्य तसेच इतर साहित्यही अर्पण करतात. नंतर वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत दोरा झाडाभोवती गुंडाळतात.भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करतात.     तसेच तुम्हांला आणखी एखाद्या व्रतावि...

हरितालिका पुजा विधी मराठी

    गणेश चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे, भाद्रपद शुद्ध तृतीयेला "हरितालिका" असे म्हणतात. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ते ठिकाण स्वच्छ करून तेथे  एका जागी चौरंग ठेवा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढा व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सजवलेल्या चौरंगावर वाळू आणून, माँ पार्वतींसह त्यांच्या सखी व शिवपिंड स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, बदाम, नाणे, फळ ठेवा.     सर्वप्रथम स्वतःला हळद- कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. माँ पार्वतींना व त्यांच्या सखींना तसेच गणपतींना हळद- कुंकू लावावे. शिवपिंडीला हळद- कुंकू लावू नये व अर्पण देखील करू नये. कारण,  शिव पूजेत हळद- कुंकू वर्ज्य आहे (हळद- कुंकू वापरले जात नाही). त्यामुळे तुमच्याकडे जर पांढऱ्या चंदनाची पावडर किंवा चंदनाची पावडर असेल तर त्या  चंदनाने तुम्ही शिवपिंडीला त्रिकुंड काढू शकता व चंदन अर्पण करू शकता. यानंतर सर्व देवांना नमस्कार करावा.घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच...

श्री हनुमान चालीसा

                                दोहा  श्रीगुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारी बरनऊँ रघुबर बिमल जसु, जो‌ दायकु फल ‌चारी।। ‌‌‌‌‌ ‌‌          ‌ ‌ ‌                   बुद्धीहीन तनु जानिके,   ‌‌ ‌         ‌   ‌            ‌‌     सुमीरौं‌ पवन कुमार।                                 बलबुद्धीविद्या देहू मोहीं,                                 हरहुकलेश विकार।। ‌‌‌                              चौपाई जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुँ लोक उजागर।। राम दुत अतुलित बल धामा। अंजनी पुत्र पवनसुत नामा।। महाबीर बिक्रम बजरंगी...

शिव सती विवाह सोहळा

    प्रजापती दक्ष त्याच्या कन्येचा म्हणजेच, माता सतींच्या विवाहासाठी स्वयंवर आयोजित करतो. त्या स्वयंवरामध्ये अनेक राज्यांतून वर (नवरा मुलगा) येतात.  दक्ष राजाच्या मनात भगवान शिवांबद्दल असलेल्या शत्रुत्वामुळे तो भगवान शिवांना स्वयंवरमध्ये आमंत्रित करत नाही. तसेच   तो ठरवतो की, सतीच्या विवाहात शिवांची द्वारपालवाली मूर्ती बनवावी जेणेकरून, या स्वयंवरमध्ये येणाऱ्या- जाण्याऱ्या लोकांचे स्वागत शिवांची मूर्ती करेल व स्वतः च अपमानित होईल असे दक्ष ला वाटते.      स्वयंवराची सुरुवात होते. तेथे माता सती वरमाला घेऊन येतात. राजा दक्ष मातेला वर निवडण्यास सांगतात व त्या वराला वरमाला घालण्यास सांगतात. माता सती सगळीकडे भगवान शिवांना शोधत असतात परंतु, भगवान शिव कोठेच दिसत नसल्याने माता सती चिंतीत होतात. दुसरीकडे राजा दक्ष पुन्हा एकदा ओरडून सांगतो, "सती योग्य वराचे चयन कर, त्वरित".      हे ऐकून माता सती स्वयंवराच्या प्रत्येक प्रवेश द्वारापाशी पाहतात. तेथे त्यांना भगवान शिवांची उभी असलेली द्वारपालवाली मूर्ती दिसते, माता सती खुश होतात. तेव्हा माता सती म्ह...

माता आदिशक्ती प्रकृती

    देवी पुराणात (महाभागवत) वर्णन केले आहे की, जगदंबिका पूर्णा प्रकृतीने ब्रह्मा, विष्णु आणि महेश(शिव) या तिघांची निर्मिती केली आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्यास सांगितले. त्यांनी ब्रह्मदेवाला त्या सृष्टीचे निर्माता, विष्णुंना पालनहार, आणि महेश म्हणजेच शिवांना संहारक बनविले. सृष्टी निर्माण करण्यापूर्वी, या तिघांनी ती सर्वोच्च शक्ती, पूर्णा प्रकृती, पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या सुरु केली. या तिघांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन जगदंबिका या विष्णुजींना आदि महालक्ष्मी रूपात,‌ ब्रह्माजींना आदि सरस्वती रूपात व शिवजींच्या कठोर तपामुळे स्वतः जगदंबिका या आदिशक्ती प्रकृती, पत्नी म्हणून  शिवांना प्राप्त झाल्या.     परंतु, सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवांना मानवनिर्मिती तसेच इतर प्रणिनिर्मिती साठी सर्वोच्च शक्तीची आवश्यकता होती म्हणून, ब्रह्मदेवांनी आदिशक्तींना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले व तेथे सर्वोच्च शक्ती माता आदिशक्ती प्रकट झाल्या. ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून व सृष्टी कल्याणासाठी त्यांनी शिवांपासून विभक्त होऊन ब्रह्माजींना सृष्टी निर्मिती मदत...

अक्षय तृतीया माहिती मराठी

    वैशाख शु. तृतीयेला "अक्षय तृतीया" म्हणतात. अक्षय म्हणजे, "नाश न पावणारे" असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. हिंदु धर्माच्या मान्यतानुसार, भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम पृर्थ्वीवर अवतरीत झाले तो हाच दिवस होय म्हणून, हा दिवस हिंदु धर्मात  "परशुराम जन्मोत्सव" म्हणून साजरा केला जातो.      अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारताच्या युद्धिष्ठीरांना "अक्षय पत्र" मिळाला. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे, अन्न कधीच संपले नाही. या पात्रातुन युद्धिष्ठीर आपल्या राज्यातील गरीब आणी भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करीत असे. या विश्वासाच्या आधारे या दिवशी प्राप्त केलेले पुण्य कधीच संपत नाही. हे वर्षानुवर्षे मानवाचे नशीब वाढवते.     महाभारताच्या काळी श्री कृष्णाने युद्धिष्ठीराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. देव आणी पित्र यांना उद्देशून या त...

माता सती माहिती भाग ४

    आपण भाग ३ मध्ये पाहिले की, माता सतींच्या सांगण्यावरून बाल पार्वती या स्वतः जवळ असलेले डमरू घेऊन त्यांच्या निवास स्थानाच्या दिशेने जातात. व काही दिवसांनतर राणी मैनावती व पार्वती या त्यांच्या हिमालय राज्यात परतात. काळ सरतो, पार्वती या युवावस्थेत प्रवेश करतात. एके दिवशी राजा हिमावन च्या महालात संदेश येतो की, ऋषी दधीचींना पार्वतींशी काही महत्वाचे बोलायचे आहे, त्यांचे मार्गदर्शन करायचे आहे. त्यावर राजा हिमावन पार्वतींना बोलतात की, पुत्री बहुतेक भगवान विष्णूंनी ऋषी दधीचींना तुझे मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले असेल. तु जा त्यांच्याकडे आणी बघ ते काय सांगतायत तुला. त्यावर पार्वती स्विकृती दर्शवतात व त्वरित ऋषी दधीचींकडे जातात.     काही क्षणानंतर ऋषी दधीची पार्वतींना सांगतात की, तुम्ही स्वतः माता आदिशक्ती सती आहात, गतजन्मी तुम्ही माता सती होता. मागील जन्मात राजा दक्षाच्या अहंकारामुळे व भगवान शिवांचा अपमान केल्यामुळे तुम्ही दक्षच्या त्याच यज्ञात स्वतः च्या योगऊर्जेने प्राण त्यागले. हे सर्व काही ऐकल्यानंतर माता पार्वती विचारात पडतात. त्यावर ऋषी दधीची म्हणतात की, माते तुम्हांला...